
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे मुलींकरिता सतत नोंदणी प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात त्यापैकी ही एक नवीन योजना आहे मोफत स्कुटी योजना. या योजनेच्या माध्यमातून अगदी फ्री तुमच्या मुलीला स्कुटी मिळणार आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र मध्ये रहिवासी असलेल्या मुलींनाच लागू होणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात राहत नसेल तर तुमच्यासाठी ही योजना फायद्याची नसणार आहे चला तर मग जाणून घेऊया मोफत स्कुटी योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
मुलींना बाहेर प्रवास करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी असतात. काही कुटुंब हे खूप गरीब असतात व त्या कुटुंबांना बाहेर प्रवास करायचे म्हटले की पैसे देखील नसतात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी मोफत स्कुटी वाटप करण्याचे ठरवले आहे. मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज कसा करावयाचा ? कागदपत्रे काय काय लागतात ? याची संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा व नंतरच मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज करा.
मोफत स्कुटी योजनेसाठी पात्रता काय ?
मोफत स्कुटी योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील मुलींनाच मिळणार आहे. यासाठी मुलींचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील फक्त गरजू मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मोफत दुचाकी योजनेचे फायदे पुढील प्रमाणे
या मोफत स्कूटी योजनेनुसार विद्यार्थ्यांना स्कूटी मोफत देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना स्कूटीच्या इलेक्ट्रिकल किंवा पेट्रोल या प्रकारातून निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
मोफत स्कूटी देण्याची ही योजना प्रवासासाठी मदत करू शकते. विद्यार्थी सहजतेने त्यांच्या महाविद्यालयात जाऊ शकतात.
या मोफत स्कूटी योजने अंतर्गत, अर्जदार सुमारे 50 हजार ते 55 हजाराचे शैक्षणिक कर्ज देखील घेऊ शकतात.
उमेदवारांना सरकारकडून अभ्यासाचे साहित्य आणि गणवेश दिले जातील.
शैक्षणिक सत्रात चांगले गुण मिळवणाच्या विद्यार्थ्यांना सरकार ही स्कूटी मोफत देते
मोफत स्कुटी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- 4 पासपोर्ट साईज फोटो.
- मुलीचे बँक पासबुक.
- १० वी पास प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
मोफत स्कुटी मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा ?
यासाठी मुलींना ऑनलाइन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मोफत स्कुटी योजनेसाठी लवकरच सरकार नवीन वेबसाईट सुरू करणार आहे. मोफत स्कुटी योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले की तुम्हाला आमचे मार्फत कळवले जाईल.
धन्यवाद