नोकरी न करता सिद्धांत जाधव हे करताय शेवाळ शेती. शेवाळ शेतीतून कमवतात लाखो रुपये.

शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्नाची निर्मिती करणाऱ्या वनस्पती. या वनस्पती वेगवेगळ्या तापमानात, वेगवेगळ्या प्रकाशात, अगदी सांडपाण्यातही जिवंत राहू शकतात. या समुद्र, नदी, साठलेले पाणी या बरोबरच वाळवंटातील कमी ओलावा उपलब्ध असतानाही जिवंत राहतात. शेवाळ एकटे किंवा दुसऱ्या वनस्पतीसोबत सहजीवनातही राहतात.

शेवाळाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. सुक्ष्म शेवाळ मोठे शेवाळ
सूक्ष्म शेवाळाच्या अनेक प्रजाती आढळतात. उदा. लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ, हरित शेवाळ इ.
निळे-हिरवे शेवाळ : त्यांना सायनोबॅक्टेरिया म्हणूनही ओळखले जाते. ते हिरव्या- निळ्या रंगात दिसतात. त्यात क्लोरोफिल ए, बी आणि फायकोबीली प्रोटीन असतात.
हिरवे शेवाळ : त्यात क्लोरोफिल ए, बी, कॅरोटिनॉईडस आणि झॅंत्तोफील्स असतात. हे बहुधा गोड्या पाण्यात आढळतात.
लाल शेवाळ : त्यात क्लोरोफिल ए, डी, कॅरोटिनॉईड्‌स, झॅंत्तोफील्स आणि फायकोबीली प्रोटीन असतात. ते दुधाच्या उत्पादनामध्ये स्थिरिकारक (स्टॅबिलाइझर) म्हणून वापरले जातात.
तपकिरी शेवाळ : हे फायकॉफिसी या वर्गातील आहेत. त्यात क्लोरोफिल ए आणि फायकोझँथीन हे रंगद्रव्य आढळते. त्यांचा वापर विविध खाद्य उत्पादनांमध्ये केला जातो.
शेवाळाचे आर्थिक महत्त्व

शेवाळ हे जागतिक बाजारपेठेत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. शेवाळाचे विविध उपयोग पुढील प्रमाणे.
अन्न : शेवाळ वर्गीय एकपेशीय वनस्पती मानवी शरिरासाठी महत्त्वाची असलेली कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे अ, ब, क आणि ई तसेच लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, मॅंगेनिज आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणूनच जपान, चीन, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलंड, आयलँड यांसारख्या देशात लोक अन्न म्हणून वापरतात.
चारा : शेवाळ हे चारा म्हणूनही मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी आणि कोंबड्यांना वापरले जाते.
मत्स्यपालन : मत्स्य शेतीत शेवाळ हे अत्यंत महत्त्वाचे असून, मत्स्य उत्पादन प्रक्रियेस मदत करते. शेवाळ नैसर्गिकरित्या पाण्यातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण वाढवण्यास मदत करते. या प्रकारे सागरी पर्यावरणातील आरोग्य राखण्यास मदत करते.
खत : शेवाळांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्यांचा वापर द्रव खत म्हणूनही केला जातो. त्यांच्या वापरातून जमिनीत असलेल्या नायट्रोजनच्या पातळीत वाढ होते.
जमिनीची पीएच पातळी कमी करतात.
मृदा संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
युग्लेना आणि क्लोरेला यांसारख्या शेवाळाच्या मदतीने जलप्रदूषण तपासले जाते.
सूक्ष्म शेवाळापासून जैवइंधन सुक्ष्म शेवाळ हे प्रकाशाच्या मदतीने व वेगाने वाढणारे आहेत. अगदी कमी प्रमाणात (९-१० टक्के) सूर्यप्रकाशाचा वापर करूनही साधारणपणे ७७ ग्रॅम जैव उत्पादन प्रति वर्गमीटर प्रति दिवस या प्रमाणे उत्पादन मिळू शकते. म्हणजेच प्रति वर्ष एका हेक्टरवर २४० टन इतके उत्पादन मिळू शकेत. सुक्ष्म शेवाळाच्या अनेक प्रजाती जैवइंधन तयार करण्यास उपयुक्त आहेत. कारण त्यांच्यामध्ये ५० ते ७० टक्के मेद (फॅट्स) असतात. यापासून निर्मित जैवइंधनाचा उपयोग वाहनांमध्ये केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ बायोइथेनॉल, बायोडिझेल. शेवाळ जर शेततळ्यांमध्ये उगवले तर माशांचीही जास्त वाढ होते तसेच शेवाळाची ही वाढ होते. अशा शेवाळाचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ औषधी गोळ्या, पावडर, खत, इत्यादी. शेवाळाचा उपयोग होतो.

.

शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे तरुणांचा कल अधिक असतो. मात्र, या धारणांना फाटा देत सांगलीतील इस्लामपूर येथील तरुणानं शेती करण्याचा निर्णय घेतला.

सिद्धांतला पारंपरिक शेती नाहीतर काहितरी वेगळे करायचे होते. म्हणून सिद्धांतने शेवाळ शेतीचा पर्याय निवडला. सिद्धांतन पाँडिचेरी येथे जाऊन शेवाळ शेतीचे प्रशिक्षण घेतले .

सिद्धांत जाधव असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून सिद्धांतने शेवाळ शेतीचा आगळावेगळा प्रयोग केला असून तो यशस्वी करून दाखवला आहे.

कोणत्याही ऋतूत अत्यंत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेवाळ शेती आहे. 6 वर्षांपूर्वी सिद्धांत यांनी एक गुंठा जागेत ही शेती सुरू केली. फुड सप्लीमेंट म्हणून शेवाळ मधून तयार होणाऱ्या पावडरचा उपयोग होतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्पुरुलीना टॅब्लेट बनवून त्याच्या विक्रीचा स्वतः व्यवसाय जाधव करत आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर सर्वच स्तरावर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो. अनेक देशीविदेशी औषध यासाठी सेवन केली जात आहेत. या सर्वात एक औषधी फूड सप्लीमेंट म्हणून स्पुरुलीनाची मागणी वाढत आहेत. स्पुरुलीना अर्थात शेवाळ. त्यामुळे या शेवाळ शेतीला आता अधिक महत्त्व येत आहे.

सिध्दांत जाधव यांचे शिक्षण बी.ए.मॅकेनिकाल झाले आहे.उच्च शिक्षण झालेले असताना नोकरी करण्यापेक्षा उद्योग करण्याचे त्यांचे ध्येय होते. उद्योगाच्या शोधात असताना सिध्दांत जाधव यांना त्यांच्या एका मित्राने शेवाळ शेतीबद्दल माहिती दिली. त्यानंतर सिद्धांतने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो केरळच्या पॉंडीचेरी आणि महाराष्ट्रातील अहमदनगर याठिकाणी सुरू असलेली शेवाळ शेतीला भेट देऊन आला. त्यानंतर आपल्या एक गुंठा जागेत शेवाळ शेतीचा प्रयोग केला.

व्यवसाय करायला सुरुवात केली. त्यावेळी थोड्या अडचणी आल्या..मुख्य अडचण आली, ती उत्पादन झालेल्या शेवाळच्या मार्केटिंगची. आज सिद्धांत स्वत: आपल्या गीता-मारुती (GM ) स्पुरुलीना टॅब्लेट तयार करतो.या गोळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मागणी देखील चांगली आहे.

शेवाळ शेतीमध्ये नांगरणी, सिंचन आणि खत यांची आवश्यकता नसते. केवळ बियाणे टाकल्यानंतर त्याची शुद्धता राखावी लागते. सुमारे ४५ दिवसांनंतर उत्पादन मिळते. कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते. १०० ग्रॅम शेवाळात एक किलो भाजीइतकेच पोषण मूल्य असते. शेवाळ शेतीमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या स्पिरुलिना या शेवाळामध्ये प्रथिनांचे प्रमाण आणि औषधी गुणधर्म यामुळे मोठे महत्त्व आहे.. त्याची भुकटी किंवा टॅबलेट स्वरूपामध्ये उत्पादन व विक्री केली जाते. मत्स्य शेतीमध्येही शेवाळ निर्मिती करून माशांची वाढ करणेही फायदेशीर ठरते आहे. यामुळे मत्स्यखाद्यामध्ये बचत करणे शक्य आहे.

धन्यवाद

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started