2000 वर UPI पेमेंट ने व्यवहार केल्यास आकारला जाणार कर

एप्रिल २०२३ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. यासह आता UPI द्वारे व्यवहार देखील महाग होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारावर शुल्क आकारले जाऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीए) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. त्याच्या परिपत्रकानुसार, २००० रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल.

युपीआयद्वारे फसवणूकीचे बळी
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाले असून यादरम्यान 95 हजारांहून अधिक लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून फसवणुकीच्या बळींची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. आकडेवारी दर्शवते की २०२०-२१ मध्ये ७७,००० लोक आणि २०२१-२२ मध्ये ८४ हजार लोक युपीआय व्यवहारादरम्यान फसवणुकीला बळी पडले.

बँक खाते आणि प्रीपेड वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास शुल्क नाही
एनपीसीआय नुसार, बँक खाती आणि प्रीपेड वॉलेटद्वारे पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) व्यवहारांसाठी कोणतेही व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही. NPCI हा नियम लागू केल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत याचे अवलोकन करणार आहे.

किती महाग होईल UPI पेमेंट करणे
2,000 रुपयांच्या वरच्या पेमेंटवर 1.1% शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दुकानदाराला 2,500 रुपये दिले तर त्यावर 1.1% शुल्क म्हणून 27.50 रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात तुम्हाला 2,500 रुपयांच्या वस्तूंसाठी 2,527.50 रुपये (2,500+27.50) द्यावे लागतील.

फेब्रुवारी 2023 मध्ये UPI द्वारे, 12.35 लाख कोटींचे व्यवहार
फेब्रुवारी महिन्यात 6 मार्च (सोमवार) रोजी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली की, गेल्या 1 वर्षात UPI द्वारे केलेल्या पेमेंटमध्ये 50% वाढ झाली आहे. तर फेब्रुवारी-2022 मध्ये UPI द्वारे 2.35 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

2016 मध्ये UPI लाँच झाल्यानंतर, डिजिटल पेमेंटच्या जगात एक क्रांती झाली. UPI ने थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. पूर्वी डिजिटल वॉलेटचा ट्रेंड होता. वॉलेटमध्ये केवायसी सारखा त्रास होतो, तर यूपीआयमध्ये काहीही करावे लागत नाही. भारतातील RTGS आणि NEFT पेमेंट सिस्टीमचे कार्य आरबीआयकडे आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणालीवर लक्ष्य ठेवून आहे.

UPI शी संबंधित काही खास गोष्टी…..

  • UPI प्रणाली रिअल टाइम फंड ट्रान्सफर प्रदान करते. एका अ‌ॅप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक केली जाऊ शकतात.
  • एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी, तुम्हाला फक्त त्यांचा मोबाईल नंबर, खाते क्रमांक किंवा UPI आयडी आवश्यक आहे.
  • IMPS च्या मॉडेलवर UPI विकसित करण्यात आले आहे. म्हणूनच तुम्ही UPI अॅपद्वारे 24×7 बँकिंग करू शकता.
  • UPI सह ऑनलाइन शॉपिंगसाठी OTP, CVV कोड, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट इत्यादींची आवश्यकता देखील नाही.

UPI ने व्यवहार. सुलभ आणि वेळेची बचत होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started