
आज आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याचा औषदासाठीही चांगल्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण की याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत.
आज आपल्या महाराष्टमध्ये जास्त प्रमाणात शेळी पालन, मासे पालन, पोल्ट्री व्यवसाय, दूध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण हे व्यवसाय लोकप्रिय आहेत आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात जे दुसरे लोक व्यवसाय करत आहेत तेच व्यवसाय करण्यास आपण लोक प्राध्यान्य देत आहोत.
खेकडा पालनाच्या जातीबद्धल विचार करायचा झाल्यास दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसर्या मोठ्या जाती, अश्या दोन प्रकारच्या दोन जाती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. लहान प्रजातींना “लाल पंजे ” म्हणून ओळखले जाते तर मोठ्या प्रजातींना ” ग्रीन मड क्रॅब्स ” म्हणून ओळखले जाते.
स्क्यल्ला जातीचे खेकडे ये नदी, नाले, समुद्र किनारी जिथे पाणी स्थिर आणि अस्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी आढळतात. गोड्या पाण्यातील खेकडे पालन याला आपण मड खेकडे पालन असेही म्हणू शकतो.
बदलता निसर्ग आणि स्पर्धेच्या जगात निव्वळ शेतीवर आवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून लोक अनेक पर्यायांचा अवलंब करतात. अशा पर्यायात शेतीला पूरक खेकडा पालन हा उत्तम व्यवसाय आहे.
अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याने खेकडा पालन करायचा ठरवले आणि. आपली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
हिंगोलीतील शेतकरी भारत जहरव यांनी खेकडा पालनाची माहिती यूट्यूब वरून मिळवली
शेतकरी भारत जहरव यांनी स्वतःच्या शेतामध्ये आठ फूट खोल शेततळे तयार केले. आणि त्यात खेकड्याच्या उच्च जातीची पिले टाकली. खेकडा पलांमधून ते वर्षाला सहा लाख रुपये कमवतात.
डोंगराळ भागातील पाच एकर शेतीचे मालक असलेले भारत जहरव डोंगराळ यांनी ही कमाल केली आहे.
डोंगराळ भागात शेती असल्याने संसाराचा गाडा चालवा आस काही उत्पन्न सुद्धा होत नाही म्हणून शेती कशी करावी आसा प्रश्न जहरव यांच्या समोर उभा राहिला होता.
स्वतः च्या शेतात 20*50 फूट आणि 8 फूट खोल असे शेततळे खोदून त्या शेत तळ्याचे काँक्रिटच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले.
बांधकाम करण्यात आलेल्या शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकली, त्यानंतर बीज रुपात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले. एक वर्ष हे खेकडे जोपासण्यात आले
खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून ही काळजी घेतली जाते.
फक्त 9 महिन्यात विक्री लायक खेकडे तयार झाले आहेत. जवळपास 12 क्विंटल हून अधिक खेकडे या शेत तळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठे असल्याने मागणी जास्त असते. 500 रुपये दर किलो प्रमाणे ह्या खेकड्याची विक्री होत आहे. यातून फक्त 9 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले.
खेकडा पालन अनुदान योजना
खेकडा पालन करण्यासाठी वेगळे कोणतेही सरकारकडून आपल्याला अनुदान भेटत नाही, आपला नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण बँकेकडून लोन घेऊन ह्या गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसायची सुरवात करू शकतो.
ह्यासाठी आपण कोणत्याही नॅशनल बँकेकडून लोन घेऊ शकतो.
अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇