श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख

Shri Swami Samarth: एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं

कथा
एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल ?

संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली ?

लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही

बोध

वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते.

वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.

स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?

स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?
श्री स्वामी समर्थ जय ज्या स्वामी समर्थ. बऱ्याच व्यक्तीना अनेक प्रश्न येतात असतात त्या पैकी एक म्हणजे मांसाहार खाणाऱ्यांची पूजा स्वामी स्वीकरतात का? सध्याच्या काळात जवळ पस साठ टक्के लोक मांसाहार करतात. अशा वेळेस असे प्रश्न येणे साहजिकच आहे. पण याबद्दल सविस्तर माहिती हि बऱ्याच ग्रंथा मध्ये दिली आहे. तसेच त्याचे काय नियम आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊ.

बऱ्याच धर्मग्रंथा मध्ये दिली आहे. तसेच भगवंत गीते मध्ये संपूर्ण वर्णन आले आहे. कंद पुराणातील काशी खण्डातील तिसऱ्या अध्यात मांसाहारा बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यामध्ये असे सुद्धा संगितले गेले आहे कि स्वर्गात मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला जागा सुद्धा मिळत नाही. तसेच याबद्दल जो व्यक्ती मांसाहारा करतो अशा व्यक्तींची भगवंत पूजा कधीच स्वीकारत नाहीत.

कंद पुराणा नंतर वराह पुराणात सुद्धा मांसाहारा बद्दल सांगितले आहे. श्री हरी विष्णू यांच्या वराह अवतार मध्ये भगवणं श्री विष्णू यांनी सांगितले आहे कि जे व्यक्ती मांसाहारा करतात त्यांची पूजा मी आधीच स्वीकारत नाही. श्री कृष्णाने भगवंत गीते मध्ये असे संगितले आहे कि मनुष्या ने काय खावे काय खाऊनये याबद्दल सविस्तर सांगितले आहे.

भगवत गीते मध्ये श्री कृष्ण सागतात जो व्यक्ती मांसाहार करतो त्याची बुद्धी क्षीण होत जाते. तसेच त्याचा अवयावर नियंत्रन रहात नाही. तसेच मानत नसताना सुद्धा वाईट गोष्टी त्याचा हातून होत जातात. तसेच अनेक वाईट पापाचा वाटेकरू बनत जातो. अशा व्यक्तीने कितीही नामस्मरण केले तरी त्याचा लाभ त्यांना होत नाही.

भगवान श्री कृष्ण भगवत गीते मध्ये आहाराचे तीन भाग केले आहेत. सात्विक आहार, राजेशीक आहार, तामसिक आहार असे तीन प्रकार आहेत. स्वतिक आहार हे सर्वांत चांगले आहार मानले गेले आहे. सात्विक आहारा मुळे मनुष्याची बुद्धी चांगली बनते तसेच आयुष्य वाढवणारे असते आणि मनाला सुद्धा करणारे असते.

तसेच हिंदू धर्मात मांसाहारा करणे योग्य कि अयोग्य याबद्दल बरेच मतमतांतरं आहे. याचे कारण असे आहे कि वेदा मध्ये मांसाहारा करण्या बद्दल माहिती दिली आहे. त्याच सोबत वेदा मध्ये पशु हत्या करणे याला पाप मानले गेले आहे. यजुर वेदा मध्ये याबद्दल सांगितले गेले आहे कि या श्रुष्टि तळावर प्रत्येकाला आपले हित जपण्याचा अधीकार आहे. ऋग्वेद मध्ये असे सांगितले आहे कि ज्या प्रमाणे आपण गायची पूजा करतो त्याच प्रमाणे इतर पशु आणि प्राण्याची पूजा करावी.

भगवंत असे सुद्धा म्हणतात कि जो व्यक्ती आपल्या जिभेचे चोचले पुरण्यासाठी प्राण्याची हत्या करोत त्याच प्राण्याचा जन्म पुढच्या जन्मी मिळतो. आणि ते सुद्धा तसेच मारले जातात. तसेच जास्त प्रमाणत मांसाहारा करणे सुद्धा हानीकार असते विज्ञान मध्ये सिद्ध झाले आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

छत्रपती शिवरायांच्या घोड्यांची नावे माहिती आहेत?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. तरुणांची मोट बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही रंजक गोष्टी…

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी रोजी सुमारे १११ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्र्याहून सुटका अशा मोहिमा मासल्यादाखल देता येतील.

लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली अन् भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले, गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती, हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, असे म्हणतात. “मी नृसिंहभान असून, श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” , हे स्वामींचे उद्‌गार, ते नृसिंहसरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. 

श्री स्वामी समर्थ १९ व्या शतकात होऊन गेले.  विविध ठिकाणी, स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा, जेव्हा ते अक्कलकोटनगरीत आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. 

इ.स. १४५९ मध्ये, स्वामींनी गाणगापुरात  श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना, त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली, ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी, उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापुर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिले.

असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे,  शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठीच जाणून घ्या गुढीपाडवा माहिती…

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून  चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायला हवी.

गुढीपाडव्याला करतात पारंपरिक वेशभूषा

गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात. . महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.

Continue reading “असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….”

असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे,  शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठीच जाणून घ्या गुढीपाडवा माहिती… यासोबतच यंदाच्या गुढीपाडव्यासाठी‌ ‌खास‌ ‌रांगोळी‌ ‌डिझाईन्स‌ ‌(Rangoli‌ ‌Designs‌ ‌For‌ Gudi Padwa)‌

Table of Contents

गुढीपाडवा इतिहास (History of Gudi Padwa In Marathi)

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली  कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.  पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते. 

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Information in Marathi)

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून  चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायला हवी.

गुढीपाडव्याला करतात पारंपरिक वेशभूषा

गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात. . महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.

Design a site like this with WordPress.com
Get started