एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल.

योजनेचा शुभारंभ

एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे.

कसे दिले जाते वित्तसहाय्य?
वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासले जाते आणि त्याच आधारावर तज्ज्ञ व्यवस्थापकांद्वारे शेतकरी, व्यापारी आणि कृषीमालावर प्रक्रिया करणार्‍यांना पावती दिली जाते. ही पावती तारण म्हणून वापरली जाते आणि त्याआधारे एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडकडून कर्जरुपी वित्तसहाय्य दिले जाते.

भारतातील पहिली डिजिटल वित्तसहाय्य योजना

वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग योजना ही भारतात डिजीटल प्रणालीवर आधारित पहिली वित्तसहाय्य योजना ठरली. कर्जासाठी अर्ज भरल्यानंतर ग्राहकांना अवघ्या 24 तासाच्या आत सहाय्य मंजूर केले जाईल. कर्जाचे अतिशय जलद वितरण आणि कृषीमालाचीही निर्धोक सोडवणूक होते. कृषी क्षेत्रातील ग्राहकांना संपन्न पेपरलेस अनुभव मिळतो.

कोणाला मिळणार लाभ?
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमधील ग्राहकांसाठी वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग उपलब्ध असेल आणि ही सुविधा क्रांती घडवून आणेल. सध्या, ही सुविधा बाजारपेठेद्वारे पारंपारिक पद्धतीने दिली जाते आणि संबंधित दस्तऐवज प्रामुख्याने हाताने लिहिलेल्या (मॅन्युअल) स्वरूपातील असतो आणि प्रत्येक कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी 7 ते 10 दिवस इतका कालावधी लागतो. परंतु एल ॲण्ड टी फायनान्सच्या नव्या उत्पादनाच्या शुभारंभामुळे, ग्राहकांना कर्जाचा अर्ज दाखल केल्यापासून २४ तासांच्या आत मंजूरी मिळविण्याची आणि त्यांच्या कर्जाशी संबंधित सर्व माहिती प्लॅनेट या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे त्यांच्या बोटाच्या नुसत्या एका टचने मिळतो. हा अनुभव याआधी कधीही ग्राहकांना मिळालेला नाही.

किती मिळेल कर्ज?
शेतकरी, व्यापारी आणि कृषीमाल प्रक्रियादार एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडच्या जवळच्या शाखेत जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. अतिशय आकर्षक व्याजदरात एक लाख ते 10 कोटी रुपयांदरम्यान ते वित्तसहाय्य मिळवू शकतात. मंजूर केलेली रक्कम पात्रता तपासणी आणि कर्ज मार्जिन श्रेणीवर आधारित असेल, तसेच ती गुणवत्तेच्या मापदंडांवर आधारित कृषीमालाच्या बाजार मूल्याच्या 25 टक्के ते 30 टक्क्यांदरम्यान असेल.

व्यवस्थापकीय संचालक काय म्हणले?
नवीन वित्तसहाय्याच्या शुभारंभप्रसंगी बोलताना, एल ॲण्ड टी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीनानाथ दुभाषी म्हणाले, “आमचे लक्ष्य हे 2026 पर्यंत किंवा त्याआधी एक उच्च श्रेणीची, ग्राहक-केंद्रित, डिजिटली सक्षम रिटेल फायनान्स कंपनी बनणे हे होय. त्याच अनुषंगाने, आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांना निकड असेल तेव्हा वित्तसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उत्पादनांवर सातत्याने काम करत आहोत. वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) ही आमच्याकडून देण्यात आलेली सुविधा असून जे ग्राहकांकडून कोणतेही फोरक्लोजर शुल्क न घेता जलद वितरण आणि लवचिक परतफेडीचे आश्वासन देते.

शेतकऱ्यांची गरज होणार पूर्ण

भारतातील रब्बी पेरणीचा हंगाम यंदा 720 लाख हेक्टरवर झाला असून विक्रमी क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली आहे. ही पेरणी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आशा आहे की, आमच्या ग्राहकांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा सोयीस्कर पद्धतीने पूर्ण करण्यात ही कर्जे मदत करतील. शिवाय, यामुळे बाजारातील वस्तूंचा पुरवठा आणि किमती स्थिर राहण्यास, उत्पादकांचे उत्पन्न सुधारण्यास आणि अन्नधान्याचे नुकसान कमी करण्यास हातभार लागेल.”

ग्राहकांना अधिकाधिक कर्जपुरवठा करण्याच्या वेगवान गतीमुळे 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत तब्बल 57 हजार कोटी रुपये कर्जाचे वाटप कंपनीने केले आहे. त्यात गतवर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 34 टक्के वाढ झाली आहे. तर ग्रामीण व्यवसाय तसेच कृषी अवजारांसाठी वित्तपुरवठ्यासारख्या प्रमुख प्रकारांमुळे एकूण कर्जवाटपात किरकोळ वित्तपुरवठा पोर्टफोलिओचा वाटा 64 टक्के झाला आहे.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूपचे सभासद व्हा
ग्रूप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केल्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या सविस्तर

अनेकदा शेतकऱ्यांनी वारंवार मागण्या करून देखील शासन त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. म्हणूनच शेवटचा मार्ग म्हणून शेतकरी आंदोलन करतात. असच आंदोलन नाशिकहून मुंबईकडे काढण्यात आले. या लाँग मोर्चाला आता अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांनी ज्या मागण्यांसाठी हा लाँग मोर्चा काढला त्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या या धडपडीचे प्रयत्नांचे चीज झाले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधाससभेत मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक
विधानसभेत शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्याचवेळी नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या लाल वादळाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती देखील त्यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे करोडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कांदा उत्पादकांना पुन्हा दिलासा
आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यात आले. परंतू, कांद्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या अनुदानात वाढ केली. तर एकनाथ शिंदे यांनी या अनुदानात पन्नास रुपयांची वाढ केली. म्हणजेच आता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये इतके कांद्यासाठी अनुदान मिळणार आहे.

आदिवासी जमीनीबाबत मोठी घोषणा
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी “आदिवासी जमिनी 4 हेक्टरपर्यंत आणि वन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून, जे जमीन कस्त आहेत त्यांचे नाव लावावे. तसेच अपात्र दावे मंजूर करावे. ज्या जमिनीवर घर आहेत, ती जमीन नियमित करण्यात यावी. त्यासह वन हक्काबाबत जे मुद्दे होते, जे दावे प्रलंबित होते, ते मार्गी लावण्यात येतील. तसेच सर्वांना शासकीय योजना लाभ मिळायला हवा. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.” तर एका महिन्यात या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहे, मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.कांदा उत्पादकांना पुन्हा दिलासा
आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यात आले. परंतू, कांद्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या अनुदानात वाढ केली. तर एकनाथ शिंदे यांनी या अनुदानात पन्नास रुपयांची वाढ केली. म्हणजेच आता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये इतके कांद्यासाठी अनुदान मिळणार आहे.

आदिवासी जमीनीबाबत मोठी घोषणा
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी “आदिवासी जमिनी 4 हेक्टरपर्यंत आणि वन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून, जे जमीन कस्त आहेत त्यांचे नाव लावावे. तसेच अपात्र दावे मंजूर करावे. ज्या जमिनीवर घर आहेत, ती जमीन नियमित करण्यात यावी. त्यासह वन हक्काबाबत जे मुद्दे होते, जे दावे प्रलंबित होते, ते मार्गी लावण्यात येतील. तसेच सर्वांना शासकीय योजना लाभ मिळायला हवा. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.” तर एका महिन्यात या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहे, मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप ला जॉइंट व्हा 👇

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन


साठवणीवर परिणाम करणारे घटक
जातीची निवड
खत, पाणी नियोजन
कांदा सुकवणे
कांद्याचे आकारमान
साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी
चाळीची रचना


कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.

कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते.

कोंब येणे – कांदा काढणीसाठी तयार झाला असता त्याची मान मऊ होते आणि पात आडवी होते. या काळात पानातील ऍबसेसिक ऍसिड कांद्यामध्ये उतरते. हे रासायनिक द्रव्य कांद्याला एक प्रकारची सुप्त अवस्था प्राप्त करून देते. रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो; परंतु खरिपातील किंवा रांगड्या हंगामातील कांद्याच्या माना पडत नाहीत. कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू असते. नवीन मुळे आणि कोंब येत असतात. कोंब येण्यामुळे जातीपरत्वे 10 ते 15 टक्के नुकसान होते.


साठवणीवर परिणाम करणारे घटक


जातीची निवड
सर्वच जाती सारख्या प्रमाणात साठवणीत टिकत नाहीत. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही.
रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे 4 ते 5 महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे फरक पडतो.
एन 2-4-1, ऍग्रीफाऊंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन या जाती 5 ते 6 महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात.

खत, पाणी नियोजन
खतांच्या मात्रा आणि खतांचा प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होत असतो. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. जास्तीत जास्त शेणखताचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे.
कृषी विद्यापीठांनी हेक्‍टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 80 किलो पालाश आणि 50 किलो गंधकाची शिफारस केली आहे. शक्‍य होईल तितके नत्र सेंद्रिय खतांमधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर 60 दिवसांच्या आतच द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते.
पाणी देण्याची पद्धत व पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी परंतु नियमित लागते. कांदे पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले, तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.


कांदा सुकवणे
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. नंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी.
चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीगकरून 15 दिवस सुकवावा. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.


कांद्याचे आकारमान
कांद्याच्या आकारमानाचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होतो. 55 ते 75 मि.मी. जाडीचे कांदे साठवणीत चांगले टिकतात. लहान गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो. दोन मोठ्या कांद्यामध्ये मोकळी जागा जास्त राहते. त्यांच्या भोवती हवा खेळती राहते, सड कमी राहते.

साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी
कांदा चाळीतील कांद्याची उंची 4 ते 5 फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. तसेच चाळीची रुंदीदेखील 4 ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये.

चाळीची रचना
कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची आणि पाणी न साठणारी जागा निवडावी. तळाशी मुरूम व वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी दोन फुटांची मोकळी जागा ठेवावी.
चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. साठवणगृहाची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. पाखीची रुंदी चार फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी. बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात, त्यात फटी असाव्यात.
चाळीच्या खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते, गरम हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होते. रात्री चाळीचे दरवाजे उघडे ठेवले तर वाऱ्याच्या झुळकेसोबत गरम हवा बाहेर काढली जाते.
चाळीचे छप्पर उसाच्या पाचटाने झाकावे. कौले महाग पडतात, चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे आलेले असावे, त्यामुळे पावसाचे ओसडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होत नाही.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रूप ला जॉइंट व्हा 👇

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन टिकेल कांदा भरपूर दिवस


साठवणीवर परिणाम करणारे घटक
जातीची निवड
खत, पाणी नियोजन
कांदा सुकवणे
कांद्याचे आकारमान
साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी
चाळीची रचना


कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.

कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते.

कोंब येणे – कांदा काढणीसाठी तयार झाला असता त्याची मान मऊ होते आणि पात आडवी होते. या काळात पानातील ऍबसेसिक ऍसिड कांद्यामध्ये उतरते. हे रासायनिक द्रव्य कांद्याला एक प्रकारची सुप्त अवस्था प्राप्त करून देते. रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो; परंतु खरिपातील किंवा रांगड्या हंगामातील कांद्याच्या माना पडत नाहीत. कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू असते. नवीन मुळे आणि कोंब येत असतात. कोंब येण्यामुळे जातीपरत्वे 10 ते 15 टक्के नुकसान होते.


साठवणीवर परिणाम करणारे घटक


जातीची निवड
सर्वच जाती सारख्या प्रमाणात साठवणीत टिकत नाहीत. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही.
रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे 4 ते 5 महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे फरक पडतो.
एन 2-4-1, ऍग्रीफाऊंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन या जाती 5 ते 6 महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात.


खत, पाणी नियोजन
खतांच्या मात्रा आणि खतांचा प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होत असतो. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. जास्तीत जास्त शेणखताचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे.
कृषी विद्यापीठांनी हेक्‍टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 80 किलो पालाश आणि 50 किलो गंधकाची शिफारस केली आहे. शक्‍य होईल तितके नत्र सेंद्रिय खतांमधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर 60 दिवसांच्या आतच द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते.
पाणी देण्याची पद्धत व पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी परंतु नियमित लागते. कांदे पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले, तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.

कांदा सुकवणे
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. नंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी.
चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीगकरून 15 दिवस सुकवावा. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.


कांद्याचे आकारमान
कांद्याच्या आकारमानाचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होतो. 55 ते 75 मि.मी. जाडीचे कांदे साठवणीत चांगले टिकतात. लहान गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो. दोन मोठ्या कांद्यामध्ये मोकळी जागा जास्त राहते. त्यांच्या भोवती हवा खेळती राहते, सड कमी राहते.

साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी
कांदा चाळीतील कांद्याची उंची 4 ते 5 फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. तसेच चाळीची रुंदीदेखील 4 ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये.

चाळीची रचना
कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची आणि पाणी न साठणारी जागा निवडावी. तळाशी मुरूम व वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी दोन फुटांची मोकळी जागा ठेवावी.
चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. साठवणगृहाची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. पाखीची रुंदी चार फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी. बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात, त्यात फटी असाव्यात.
चाळीच्या खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते, गरम हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होते. रात्री चाळीचे दरवाजे उघडे ठेवले तर वाऱ्याच्या झुळकेसोबत गरम हवा बाहेर काढली जाते.
चाळीचे छप्पर उसाच्या पाचटाने झाकावे. कौले महाग पडतात, चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे आलेले असावे, त्यामुळे पावसाचे ओसडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होत नाही.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रूप ला जॉइंट व्हा 👇

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

उपसरपंच निवडणुकीसाठी थेट निवडून आलेल्या सरपंचाला मतदानाचा अधिकार

आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपलेली असते. त्यानंतर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेला असतो. जनतेतून सरपंच निवडून आल्यानंतर सर्व तयारीला लागतात ते म्हणजे ग्रामपंचायतीची दुसरी महत्वाची खुर्ची ‘उपसरपंच‘ यांची. उपसरपंच यांची जनतेतून निवड नसते, तर ती आपल्या प्रभागातून निवडणून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच यांची निवड होते. आता उपसरपंच होण्यासाठी आपल्याला निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला उपसरपंच म्हणून निवडून आणता येते.

पण उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज केल्यानंतर त्यापैकी जास्त मते ज्या सदस्याला पडतात तो उपसरपंच होतो. आता यामध्ये उपसरपंच पदासाठी कोणाला मतदान करता येते त्याचबरोबर थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना किती मतांचा अधिकार असतो ते आपण पाहूया.

प्रत्येक पंचायत आपल्या निवडून आलेल्या सदस्यांमधून एका सदस्याला उप सरपंच म्हणून निवडून देईल. यामध्ये निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला एक मतदान करण्याचा अधिकार असतो. तर थेट जनतेतून आलेल्या सरपंचांना मतदानाचा कोणता अधिकार असतो ते पहा.

१. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

२. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे.

३. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी.

४. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६(४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करुन विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल.

आपल्याला वरील प्रमाणे उपसरपंच निवडणुकीसाठी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे अधिकार सांगण्यात आलेले आहेत.

घरबसल्या उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा?

उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन कसा काढावा – Income Proof Certificate Online
सर्वात आधी उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला http://www.aaplaesrakar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यापैकी एक भाषा निवडा.

ज्याच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्याच्या नावाने नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारे आपला मोबाइल नंबर पडताळावा लागेल .

पुढे एक युजरनेम बनवून पासवर्ड तयार करावा व त्यानंतर पुढे नाव आणि जन्मतारीख टाकून अकाउंट तयार करावे, तसेच आधारकार्ड वरील नाव देखील टाकावे.

अश्या प्रकारे तुमचं अकाउंट तयार झाल्याचा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर लॉगिन करा..

लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात खाली महसूल विभाग असे आहे . महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडावे, तिथे सर्वात खाली उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) असा पर्याय आहे, तो निवडा, पुढे proceed बटनावर वर क्लिक करा . पुढे उत्पन्नाचा दाखला असा पर्याय निवडावा तिथे तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल,

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात –
ओळख पुरावा

आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र पैकी कोणतेही एक

पत्त्याचा पुरावा –

पासपोर्ट
रेशन कार्ड
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
वीज बिल
वाहन चालवण्याचा परवाना
जर तुमचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर

जन्माचा दाखला
बोनाफाईड प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला 15 दिवसात तहसीलदारमार्फत मिळतो, पण आता ऑनलाईन तुम्हाला २-३ दिवसात देखील मिळतो . उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तूम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल जसे कि 1 वर्ष चा किंवा 3 वर्षचा.

अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा व नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकावा.

खाली I agree वर क्लिक करा.

यानंतर आपलेसरकार या वेबसाईट वर खालील document अपलोड करावे लागतील –

  • अर्जदाराचा फोटो
  • ओळखीचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • उत्पनाचा पुरावा
  • तलाठी प्रमाणपत्र
  • स्वघोषणापत्र.

documents अपलोड केल्यानंतर तुम्हाला याची फी ३4 रुपये द्यावी लागेल, हि फी तुम्ही upinetbankingडेबिट कार्ड द्वारे देऊ शकतात.

त्यांनतर तुम्हाला successful चा message येईल.

अश्या प्रकारे तुम्ही उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढू शकतात.

त्यांनतर २-३ दिवसात पुन्हा लॉगिन करून तुम्ही उत्पन्नाचा दाखला pdf डाउनलोड करू शकतात.

दुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी आणि सहकारी बँकांचे नियमन करते. बँकेची आर्थिक (Financial) स्थिती कशी आहे हे बँक वेळोवेळी तपासत असते. बँक रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेले नियम पाळत आहे की नाही. जर एखादी बँक नियमांचे उल्लंघन करताना आढळली, तर अशा परिस्थितीत बँक बँकेला मोठा दंड ठोठावते. यासोबतच बँकेची आर्थिक (Finance) स्थिती चांगली नसल्यास सेंट्रल बँक (Reserve Bank of India) अशा बँकांचा परवानाही रद्द करते. नुकतेच सेंट्रल रिझर्व्ह बँकेने एका बँकेवर कडक कारवाई करत तिचा परवाना रद्द केला आहे.

अशा स्थितीत बँकेच्या (Bank) खातेदारांचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही बँक कोणती आहे आणि बँकेच्या ग्राहकाला (customer) खात्यात जमा केलेली रक्कम मिळण्याचा अधिकार आहे की नाही ते आम्हाला कळवा. आरबीआयने कोणत्या बँकेवर कारवाई केली आहे. ज्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली त्या बँकेचे नाव बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड (Babaji Date Mahila Sahakari Bank Limited) आहे. ही महाराष्ट्रातील यवतमाळची सहकारी बँक आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकेवर कारवाई केली आहे.

यासोबतच या बँकेत कमाईचे कोणतेही साधन नव्हते. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या बाजूने निर्णय घेत रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे (बाबाजी दाते महिला सहकारी बँक मर्यादित परवाना रद्द). RBI ने बँकेवर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, ग्राहक खात्यातून पैसे जमा करू शकणार नाही किंवा काढू शकणार नाही.

ग्राहकांच्या खात्यात जमा झालेल्या पैशांचे काय होणार?
बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द झाल्याची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करून आरबीआयने त्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या 79 टक्के ग्राहकांना विमा ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) RBI च्या विमा योजनेअंतर्गत जमा केलेले पैसे मिळतील. DICGC ही रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे जी सहकारी बँकांच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. अशा परिस्थितीत, DICGC खातेधारकाला 5 लाखांच्या ठेवीवर पूर्ण विमा दावा देते. DICGC डेटानुसार, 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत, कोणत्या बँकेत एकूण विम्याची रक्कम 294.64 कोटी रुपये आहे.

आरबीआयने या बँकांचे परवाने यापूर्वीच रद्द केले आहेत, याआधीही
रिझर्व्ह बँकेने देशातील अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. ही बँक महाराष्ट्राची लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड आहे. याशिवाय पुणेस्थित ‘द सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’चा (सेवा विकास सहकारी बँक) परवानाही आरबीआयने रद्द केला आहे. आरबीआयच्या या निर्णयामागील कारण म्हणजे या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती.

आता सर्रास होणारा वाळू उपसा होणार बंद! सरकारच थेट वाळूची करणार ऑनलाईन विक्री, ग्राहकांना मिळणार घरपोच सेवा

निसर्ग पासून आपला बचाव करण्यासाठी लोकांना घराची गरज असते. परंतु ही गरज आता गरज म्हणून पाहिली जात नाही. कारण आता प्रत्येकालाच लक्झरी आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपलं घर मोठं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु या घरासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे वाळू. घर दणकट व्हावे म्हणून वाळू उपयुक्त ठरते. वाळूचे (Sand Online) दरही गगनाला भिडले आहेत. सामान्य लोक घर बांधण्याठी वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करतात. त्याचवेळी चढ्या भावाने वाळूची खरेदी (Sand Online) करावी लागते. परंतु आता वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकारच घरपोच वाळूची सेवा देणार आहे.

सरकार ऑनलाईन करणार वाळूची विक्री
आता वाळू माफीयांची ठेकेदारी सरकार बंद करणार आहे. कारण वाळू विक्रीसाठी स्वतः सरकार पुढे येणार आहे. आता ग्राहकांना जास्त दराने वाळू माफियांकडून वाळू खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकार ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना ग्राहक वाळूची विक्री करणार आहे.

मिळणार घरपोच सेवा
सरकार आता वाळूची विक्री ऑनलाइन करणार असल्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. कारण आता ग्राहकांना थेट घरपोच सेवा मिळणार आहे. वाळू खरेदी करून ती घरी कशी आणायची यासाठी ग्राहकांना खटाटोप करायला लागणार नाही. तसेच वाळू खरेदी आणि घरपोच करण्यासाठी लागणारा अधिकचा खर्चही आटोक्यात येणार आहे.

सरकार वाळूचे डेपो लावून ऑनलाइन विक्री करणार आहे. तसेच घरपोच सेवेचे धोरण देखील स्वीकारणार आहे. याबाबत माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.
तर पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘निळवंडे’ धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. ची माहिती देखील महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनो ग्रामपंचायतीत योजनेच्या लाभासाठी दखल न घेतल्यास ‘अशी’ नोंदवा तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच महात्मा गांधी रोजगार हमी योजना, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत या योजनेच्या (Mahaegs Portal) माध्यमातून होणाऱ्या कामांची तपशीलवार माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी मनरेगा (Mahaegs Portal) ही योजना चालू करण्यात आली. या योजनेचा ग्रामीण भागातील जनतेला खूप लाभ झाला. मात्र यातून बऱ्याच तक्रारीही येऊ लागल्या.

शेतकऱ्यांची घेतली जात नाही दखल
काही वेळा या तक्रारींची दखल घेतली गेली, काही वेळा या तक्रारी डावलण्यात आल्या. मात्र आता या तक्रारींची दखल सर्रास घेतली जाईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी मनरेगा, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या माध्यमातून मनरेगा संदर्भातील ग्रामीण लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल.

काय आहे मनरेगा?
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना ग्रामीण भागातील जनतेला वर्षातील किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, या कामातून झालेल्या आर्थिक कमाईतून त्यांचं जीवनमान उंचवावं अशी ही योजना आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही योजना सुरू झाली होती. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात मिळाला होता.

‘अशी’ आहे वेबसाईट
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी mahaegs.maharashtra.gov. in या वेबसाईटचं लोकार्पण केलं. या वेबसाईटवरून मनरेगाची सध्या चालू असलेली कामं, डॅशबोर्ड, विविध तक्रारी इत्यादींची माहिती मिळवता येणार आहे. तसेच पूर्वी दाखल केलेल्या तक्रारींचं निवारण झालं आहे की नाही हेही तपासता येणार आहे. अशा रीतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून फायदा होणार आहे.

अशी’ नोंदवा तक्रार

  • mahaegs.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
  • यानंतर ‘तुमची तक्रार नोंदवा’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर जे पेज ओपन होईल तिथे आपला मोबाईल क्रमांक मागितला जाईल. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर साइन इन करण्यासाठी एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन होईल.
  • यानंतर पुढे आपलं नाव विचारलं जाईल. त्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड वर ‘नवीन तक्रार नोंदवा’ या ऑप्शन वर क्लिक करा.
  • यानंतर मागितलेले तपशील योग्यरीत्या भरल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल
    अशाप्रकारे मनरेगाच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आपल्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

रुद्राक्षांचे प्रकार किती.? जाणून घ्या अचूक माहिती.. प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य लाभ.!!

रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात.

आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्ण वीर्य व आयु कफनाशक आहे. त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्र साधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.

रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला एकशे आठ रुद्राक्षांची असते. सत्तावीस मण्यांचीही माला गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. वळ्यांएवढा, वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो, अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की, दोन तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वत:भोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खाल पर्यंत गेलेली तरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळते, त्याला नदीची मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राशांची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1, 3, 5, 9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात.

रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. दोन रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात, त्याला शिव पार्वती समजले जाते.

एकमुखी रुद्राक्ष – एकमुखी रुद्राक्ष भुक्तिमुक्ती देणारा आहे. तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात. जेथे त्याचे पूजन होत असेल तेथून लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कोठलाही उपद्रव होत नाही.

दोन मुखी रुद्राक्ष – दोन मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात. हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे. दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. याने एकाग्रता वाढते आणि शांती प्राप्त होते. याने स्त्री रोग, नेत्र रोग आणि किडनी संबंधी आजार दूर होतात.

तीन मुखी रुद्राक्ष – तीन मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात. यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते. याने वास्तुदोष दूर होतो आणि आत्मविश्वासात वृद्धी होते.

चार मुखी रुद्राक्ष – चार मुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे यामुळे धन- दौलतीची वाढ होते. याने संमोहन शक्ती येते. नाक, कान व गळा संबंधी आजार, तसेच कुष्ठरोग, पक्षाघात, दमा इत्यादीसारख्या आजारांमध्ये फायदा होतो.

पाच मुखी रुद्राक्ष – पाच मुखी खुद्द रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. याच्यामुळे पाप वृद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्तिमार्गाकडे वळतो. या रुद्राक्षामुळे किडनी, शुगर, लठ्ठपणा असे आजार बरे होतातसहा मुखी

सहा मुखी रुद्राक्ष – कार्तिकेय स्वरूप आहे तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेश स्वरूपही आहे व तो उजव्या हाता बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो. कुष्ठरोग, नपुंसकता, मूतखडा, किडनी आणि मूत्र रोग इतर आजारासाठी धारण करता येतं.

सात मुखी रुद्राक्ष – सात मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणार्‍याला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने सहा मातृक, सात अश्व व सात ऋषी प्रसन्न होतात. शारीरिक दुर्बलता, उदर रोग, पक्षाघात, काळजी, हाडाचे विकार, कर्करोग, दमा, कमजोरी इतर आजार असल्यास सात मुखी रुद्राक्ष धारण केलं जातं.

आठ मुखी रुद्राक्ष – आठ मुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरवरूप आहे. हा धारण करणार्‍याला भरपूर आयुष्य लाभते. अशांती, सर्पभय, त्वचा रोग, गुप्त रोग इतर आजारावर हे रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

नऊ मुखी रुद्राक्ष – नऊ मुखी रुद्राक्ष कपिल मुनी आहे आणि त्याची अधिष्ठाची देवता दुर्गा माहेश्वरी आहे, हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काही लोक याला स्वरूपही मानतात. फुफ्फुसासाठी, ताप, नेत्र रोग, कान रोग, संततीसाठी, ओटीपोटात वेदना, संक्रामक रोग शांतीसाठी धारण केलं जातं.

दशमुख रुद्राक्ष – दशमुख रुद्राक्ष स्वत: जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात. हा अंगावर धारण केल्याने पिशाच्च, ब्रह्मराक्षस, सर्प इत्यादींचे भय नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो. यामुळे फुफ्फुसासंबंधी आणि हृद्यासंबंधी आजारात आराम मिळतो.

अकरा मुखी रुद्राक्ष – अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. याची मुख्य देवता इंद्र आहे. याचे पूजनाने अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते. स्त्री रोग, स्नायू रोग आणि वीर्य संबंधी आजार लाभ प्रदान करणारं ठरतं.

बारा मुखी रुद्राक्ष – बारा मुखी रुद्राक्ष धारण करणारा आदित्यासमान आहे. हा विष्णुरूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाहीसे होते. याने तेज आणि ऐश्वर्यात वाढ होते. डोके दुखी, नेत्र रोग, ज्वर, हृदय रोग आणि मूत्राशय संबंधी आजारात फायदा मिळतो.

तेरा मुखी रुद्राक्ष – तेरा मुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वेदेवासमान आहे. आणि त्याच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो. याने आकर्षण, सुंदरता आणि समृद्धी यात लाभ होतो. मूत्राशय, नपुंसकता, गर्भासंबंधी आजार, किडनी, लिव्हर संबंधी आजार दूर होण्यास मद‍त मिळते.

चौदा मुखी रुद्राक्ष – चौदा मुखी रुद्राक्ष परम शिवरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते. यास हनुमानाचे स्वरूपाची मानतात. तंत्र मंत्र, टोटके, भूत-प्रेत, पिशाच्च याहून रक्षा करतं. वैराग्य, बेचैनी, भीती, पक्षाघात, कर्करोग, प्रेत बाधा अशा समस्यांवर लाभदायक ठरतं.

रुद्राक्ष शेंडीत एक, डोक्यात चाळीस, गळ्यात बत्तीस, प्रत्येक वाहूत सोळा, कानात एक एक, हातात बारा आणि एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी. असे शिव पुराणात सांगितले आहे.

त्याचप्रमाणे शिव पुराणात रुद्राक्षाची कथा सांगितली आहे, ती अशी – पूर्वी एक हजार दिव्य वर्षे तप केल्यामुळे श्री शंकराचे मन क्षुधित झाले होते. त्याने सहज लीलेने डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले. त्या अश्रुबिंदूचेच रुद्राक्षाचे वृक्ष झाले. प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले. नंतर ते दुसरीकडे पसरले. म्हणून परम पावन रुद्राक्ष श्री शंकरला अतिशय प्रिय आहे. एखादे वेळेस रुद्राक्ष किडतात किंवा तडकतात, तेव्हा ते काढून टाकून नवीन धारण करतात.

मित्रानो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. फक्त भारतीय समाज मान्य माहिती असलेली कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात . इथे शेअर होणारे हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर कोणीही अंधश्रद्धा म्हणून करू नये .

आमचा लेख आवडला असेल तर आमच्या पेजला लाईक करा शेअर करा फॉलो करा


धन्यवाद

Design a site like this with WordPress.com
Get started