उन्हाळ्यात अशी करा जमिनीची मशागत

शेती मग ती बागायती असो कोरडवाहू ,चिरस्थायी शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्णशेती शाश्वत कशी करता येईल हे पहिले पाहिजे. नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमिन, पाणी व हवामान ही महत्वाचे घटक येतात. या तीनही घटकामध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता, त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्य साधारण महत्व आहे.

पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्वमशागत असे म्हणतात. या पुर्वमशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगला स्थितीत आणणे.
शेतकरी जमिनीची मशागत अनेक कारणांसाठी करत असतो. बियांचे अंकुरण आणि मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत करणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे तणांचा नायनाट करणे.

पुर्वमशागतीमध्ये नांगरट,कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, जमिन घट्ट करणे, सरी काढणे इत्यांदी कामांचा मशागतीस समावेश होतो. प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावीच असे नाही. आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे. त्याकरिता त्या जमिनीवरील मागील पीक, पुढे द्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते.

नांगरट कशी करावी ?
नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो. रब्बी-उन्हाळी व हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

नांगरट किती खोल करावी ?
हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यांदी बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० से.मी खोल नांगरट करणे आवश्यक आहे, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी जमिन १० ते १५ से.मी. खोल नांगरावी.

नांगरटीचे फायदे
नांगरटीमुळे जमिन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
थरांची उलथापालथ होते ,जमिन भुसभुशीत होते.
हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात व जमिनीतील जीवाणूंची वाढ होते.
पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
तणांचे बी नांगरटीमध्ये खोल गाड्ल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते.

खोल नांगरटीमुमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता जमिनीस पोषक ठरते.
तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
अशा प्रकारे नांगरटीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.

ढेकळे फोडणे
जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पीक काढल्यानंतर जमिन नांगरण्यास वेळ गेल्यास मध्यम व भारी जमिनीत ढेकळे निघतात, अशा जमिनीत खरीपाची पिके घ्याव्याही असल्यास पहिला पाऊस पडेपर्यंत ढेकळे तशीच राहू द्यावीत. पावसामुळे व उन्हामुळे ढेकळे नरम होऊन फुटण्याचे काम आपोआप होते. दोनही हंगामात पिके घ्यावयाची असल्यास बैल अवजााराच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टर सहाय्याने ढेकळे फोडावीत. पाणी उपलब्ध असल्यास पाणी दिल्याने ढेकळे नरम पडतात व नंतर मैद फिरवल्याने ढेकळे फुटतात. जमिन सपाटीकरण होते व उगवून आलेले तणही मारून जाते.

ढेकळे फोडण्याचे फायदे
ढेकळे फोडण्याने जमिन सपाट करण्यास सुलभ होते. जमिनीस कुळव्याच्या पाळ्या देता येतात. जमिनीत शेणखत/कंपोस्ट खत चांगले पसरविता येते. सरी सरळ रेषेत येते. गादीवाफे सहजरीत्या तयार करता येतात. ढेकळे फोडल्याने पूर्वीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा वेचता येतो.

कुळवणी किंवा वखरणी
कुळवणीमुळे जमिन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहते. पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात.तणांचा नाश होण्यास मदत होते.शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
जमिन सपाट करणे.
पावसाचे पाणी किंवा पटाचे पाणी एकाच दिशेने जमिनीतून वाहून न जाता किंवा कुठेतरी साचून न राहता ते सर्वठिकाणी सारखे बसण्यासाठी जमिन सपाट करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पिकांची एकसारखी वाढ होण्यास मदत होते. हे पुर्वमाशागातीचे काम प्रत्येक जमिनीत व दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते.

शेणखताचा/कंपोस्ट खताचा वापर
जमिनीचा भुसभुशीतपण टिकून राहण्यासाठी तिच्या कणांची रचना सुधारली पाहिजे. यासाठी सेंद्रीय खते म्हणजे शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करणे महत्वाचे आहे. शेणखताच्या वापराने जलधारणशक्ती वाढते म्हणून पूर्वमशागतीच्या कामात शेणखत घालण्याच्या कामाचा अंतर्भाव करावा. अशा रीतीने शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची पूर्वमशागत करावी.

जमिन नांगरून तापू देणे.
खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमिन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते, शिवाय जमिनीची इलेक्ट्रिक कंडकटीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते.

आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी,वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते,त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

Post ऑफिसची नवीन योजना; मिळणार एवढे व्याज

पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही ( NSC ) समावेश आहे. या योजनेत चांगल्या व्याजासह कर सवलतीचा फायदा ग्राहकाला मिळतो. ही गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरते.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या देशात उपलब्ध आहेत. यात एलआयसी, बॅंकेत फिक्स डिपॉझिट, शेअर बाजार, रिअल इस्टेट असे अनेक पर्याय आहेत. असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना सर्वात भरवशाचा पर्याय म्हणून टपाल खात्याच्या (Post Office) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही (NSC) समावेश आहे. पोस्टाच्या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीचा पर्याय हा सर्वात सुरक्षित आणि परतावा देणारा मानण्यात येतो. बँकेतील योजनेत पैसा गुंतववल्यास आणि बँक दिवाळखोरीत गेल्यास तुम्हाला पाच लाखांची नुकसान भरपाई मिळेल, जर तुम्हची गुंतवलेली रक्कम जास्त असली तरी. मात्र टपाल खात्याला सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळे टपाल खात्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी आहे. या बचत योजनेत कमीत कमी रक्कमेपासून सुरुवात करता येते.

NSC च्या खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती कितीही NSC खरेदी करू शकते. मात्र, गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1 हजार रुपये आहे.
– आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत NSC मध्ये गुंतवलेल्या मुद्दलावर 1.5 लाख कर. पर्यंत सवलत मिळते
– व्याज दरवर्षी जमा केले जाते, परंतु कोणत्याही टीडीएसची कपात न करता केवळ परिपक्वतेच्या वेळीच व्याज गुंतवणूकदाराला दिले जाते.
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे 100 रुपये, 500 रुपये, रुपये 1000, रुपये 5000 आणि 10,000 रुपयांच्या मूल्यांमध्ये जारी केली जातात..
– तुम्ही सर्व प्रमुख बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी NSC गहाण ठेवू शकता. यामध्ये गुंतवणूकदार किंवा गुंतवणूकदार स्वत: त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनेट करू शकतात.
– अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर देखील प्रमाणपत्रे खरेदी केले जाऊ शकतात.
– पहिल्या 4 वर्षांसाठी NSC मधून मिळालेले वार्षिक व्याज पुन्हा गुंतवले जाते. मात्र, 5 व्या वर्षीचे व्याज पुन्हा गुंतवले जाऊ शकत नाही.
– NSC एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते
– तुमचे मूळ प्रमाणपत्र हरवले, चोरीला गेले, नष्ट झाले किंवा खराब झाले तर तुम्हाला डुप्लिकेट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देखील मिळते. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि तो पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.
– NSC चा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. मात्र, गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाल्यास या मुदतीपूर्वी त्याचा वारसदार गुंतवणूक काढू शकतो.


NSC कसे खरेदी करावे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करण्याचे तीन मार्ग आहेत.

एकट्याचे प्रमाणपत्र
या अंतर्गत एखादी व्यक्ती स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकते.

संयुक्त धारक प्रमाणपत्र
यामध्ये दोन गुंतवणूकदार मिळून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे खरेदी करतात आणि मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम दोघांना समान दिली जाते.

संयुक्त ‘बी’ प्रमाणपत्र
हे प्रमाणपत्र देखील दोन लोकांनी मिळून विकत घेतले जाते. मात्र, यामध्ये मॅच्युरिटी रक्कम फक्त एकालाच दिली जाते.

गुंतवणूक करण्यासाठी अटी
– सर्व भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
– प्रौढ व्यक्ती वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे (3 प्रौढ), 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन किंवा अल्पवयीनांच्या वतीने पालक योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
– कोणताही अनिवासी भारतीय ( एनआरआय) नवीन एनएससी खरेदी करू शकत नाही. मात्र, एनआरआय होण्यापूर्वी त्यांच्याकडे एनएससी असल्यास ते परिपक्व होईपर्यंत ते कायम ठेवू शकतात.
– ट्रस्ट आणि हिंदू अविभक्त कुटुंबे गुंतवणूक करू शकत नाहीत.
– हिंदू अविभक्त कुटुंबाचे प्रमुख फक्त स्वतःच्या नावाने एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

कर सूट
– NSC मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळते.
– गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर चार वर्ष कर आकारला जात नाही.
– पाचव्या वर्षी मिळालेल्या व्याजावर मात्र कर आकारला जातो.
– NSC वर टी़डीएसही कापला जात नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवर कर्ज
– फक्त भारतीय नागरिक एनएससीच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज करू शकतात.
– सध्या कर्जाची सुविधा काही आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे दिली जात आहे.
– कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा योजना योजना संपण्यास किती कालावधी शिल्लक राहिला आहे यावर अवलंबून असतो.
– कर्जाचा व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलवर आणि बँकेवर अवलंबून असतो.

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत सध्या 6.8 टक्के व्याजदर मिळते. यातील व्याज चक्रवाढ दराने मिळते. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित रक्कम मिळते. 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांच्या कालावधीनंतर 1389.49 रुपये होते.

गुंतवणूक रक्कम

या अल्पबचत योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. व्यक्तीला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीवर कुठलीही अधिकत्तम मर्यादा नाही

खाते कोण उघडू शकेल?
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, तीन ज्येष्ठ व्यक्ती मिळून संयुक्त खाते उघडता येईल. याशिवाय या योजनेत सज्ञान नसलेल्या व्यक्ती अथवा लहान मुले पालकांच्या देखरेखीखाली खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलालाही स्वतःच्या नावावर खाते उघडता येणार आहे.

योजना कालावधी
या अल्पबचत योजनेत गुंतवलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजासह परत मिळते.

योजनेची इतर वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतील.
या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावटीसाठी दावा करता येतो.
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये 5 वर्षांच्या मुदतीपूर्वीच खाते बंद करता येईल.
यामध्ये एकल खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा संयुक्त खात्यातील सर्व खातेदारांच्या मृत्यूनंतर खाते बंद करता येते.

याशिवाय कोर्टाच्या आदेशानुसार खातेही बंद करता येईल.

अमेरिकन फळभाजीची शेती झुकिनी पिकाची संपूर्ण माहिती.

अलीकडेच या पिकाची लागवड आपल्या भागात करण्यास सुरवात झाली असून बाहेरून आयात केलेल्या वाणांची लागवड शेतकरी मोठ्या शहरांच्या आसपास करू लागले आहेत. या पिकाला मोठ्या हॉटेल्समधून आणि विशिष्ट वर्गाच्या श्रीमंत लोकांकडून मागणी वाढत आहे.

झुकिनी ही सहज पिकवता येणारी विदेशी भाजी आहे. विदेशी भाजीपाला शेती सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झुकिनी शेती हा एक उत्तम पर्याय आहे. काकडीसारखेच दिसणारे हे फळ अधिक मुलायम, कुरकुरीत आणि चविष्ट असल्याने याचा वापर व प्रसार इतर लोकांमध्येही होण्यास वाव आहे.

आपण स्वयंपाक आणि कच्ची खाण्याच्या उद्देशाने झुकिनी वापरू शकता. ही फळभाजी आहे आणि सामान्यतः चवदार पदार्थांमध्ये वापरले जाते. त्याला समर स्क्वॅश असेही म्हणतात.

ही भाजी पिवळा, हिरवा किंवा हलका हिरवा अशा तीन रंगात उपलब्ध आहे. झुकिनी भाजीचा आकार काकडीसारखा असतो आणि ही भाजी वापरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ती अपरिपक्व असते आणि बिया येण्यापूर्वी 6 ते 8 इंच लांब असते.

झुकिनी हे फळ आहे आणि उन्हाळ्यातील स्क्वॅशचे विविध प्रकार आहे. ते अपरिपक्व असताना याची काढणी केली जाते.

झुकिनी मध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पती संयुगे समृद्ध आहे. याचे अनेक फायदे आहेत जसे पचन सुधारते, हृदयरोगाचा धोका कमी करते, हे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. झुकिनी फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यासही मदत होते. काही लोक कच्च्या झुकिनी चाही आनंद घेतात, जे सॅलडमध्ये उत्तम काम करते. झुकिनी मधुमेहासाठी उपचार प्रभावी आहे.

झुकिनी व्हिटॅमिन सी, बी 6 आणि व्हिटॅमिन ए चे स्त्रोत देखील आहे. खनिजांमध्ये मॅंगनीज, पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील समाविष्ट आहेत. झुकिनी भाजी ही उन्हाळी हंगामातील सर्वोत्तम फळभाजी आहे.

झुकिनी किंचित कडू, सौम्य चव असते आणि थोडीशी गोड असते.

लागवडीचा हंगाम

झुकिनीची लागवड उन्हाळी हंगामात प्रामुख्याने केली जाते. पेरणी जानेवारीमध्ये करावी. रोपे रूट ट्रेनरमध्ये तयार करून एक महिन्याची रोपे मुख्य शेतात लावतात. पेरणी केल्यापासून 10 – 14 आठवड्यांत पीक काढणीसाठी तयार होते.

उन्नत वाण

झुकिनीचे हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. हे आयात झालेले पीक असल्याने सर्वच वाण हे परदेशातील आहेत. यामध्ये आपल्या भागात लागवड करण्यासाठी झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश आणि ॲरिस्टोक्रॅट या वाणांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

झुकिनीची गर्द हिरव्या रंगाची फळे असलेली जात फार लोकप्रिय असून फळांचे उत्पादन अधिक येते. याचा वापर सलाड म्हणून तसेच भाजी करण्यासाठी होतो.

गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांच्या जाती असून गर दुधाळ रंगाचा आणि चांगल्या स्वादाचा असतो. गोल्ड रश वाण लवकर येणारा असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. ॲरिस्टोक्रॅट हा संकरित वाण आहे. हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.

झुकिनी वाण (Zucchini Varieties)
जगात झुकिनीचे पिकाचे अनेक वाण

झुकिनीचे सर्वोत्तम प्रकार खाली दिलेला आहे.

Black beauty ही एक लवकर वाढणारी जात असून तिचे उत्पादन जास्त आहे.
Green Machine ही जात ४५ दिवसांत पक्व होण्यास वेळ लागतो
Costata romanesco त्याची चव possum असते आणि nutty-flavored Italian zucchini. ते ५२ दिवसांत काढणीस तयार होईल.
Ambassador ही एक लवकर वाढणारी विविधता आणि गडद हिरवी आहे. ते 50 दिवसात काढणीस तयार होईल.
Gold rush दंडगोलाकार फळ 45 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
French white ही जात लहान बागांसाठी असून ५० दिवसांत कापणीसाठी तयार होते.
Eightball हे गडद हिरव्या ग्लोब फळ आणि चवीनुसार लोणी आहे आणि 40 दिवसांत कापणीसाठी तयार आहे.
Seneca ते ४२ दिवसांत कापणीसाठी तयार होईल.
spacemiser ही एक उच्च उत्पादन देणारी विविधता आहे. हिरवी फळे बेबी स्क्वॅश म्हणून काढली जाऊ शकतात आणि 45 दिवसात काढणीसाठी तयार होतात.
Dunja ते मध्यम आकाराचे आणि गडद हिरवे असून ४७ दिवसांत काढणीस तयार होते.
Spineless beauty परिपक्व होण्यासाठी 46 दिवस लागतात.
Spineless perfection परिपक्व होण्यासाठी 45 दिवस.


बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धत

झुकिनी हे पीक एक हेक्टर लागवडीसाठी 1.5 ते 2 किलो बियाणे लागते. लागवड 60 सेंमी. X 60 सेंमी. अंतरावर करावी. लागवड बियाणे टोकून किंवा रोपे तयार करून पुनर्लागवड करूनही करता येते. एका ठिकाणी 3 बिया टोकून उगवण झाल्यावर सशक्त व निरोगी एकच रोपटे ठेवावे. उगवणीसाठी सर्वसाधारण 5 – 8 दिवस लागतात. उगवण चांगली होण्यासाठी पेरणीच्या अगोदर बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून घ्यावे.

झुकिनी पिकाची पुनर्लागवड करण्यासाठी रोपे रूट ट्रेनर्समध्ये तयार करून सर्वसाधारण एका महिन्याची रोपे मुख्य शेतात लावावी. लागवड सऱ्यांवर किंवा ठिबक सिंचन पद्धतीने केल्यास गादीवाफ्यांवर करता येते. झुकिनीची
लागवड शेतात तसेच शेडनेट हाऊसमध्येही चांगल्या प्रकारे करता येते. शेडनेटचा वापर केल्यास उत्पादन चांगले येते.

खते आणि पाणी व्यवस्थापन

झुकिनी या पिकाच्या लागवडीच्या अगोदर शेताची तयारी करताना हेक्टरी 20 – 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 50 किलो पालाश याप्रमाणे खते द्यावी. ठिबक सिंचनावर पीक घेतल्यास खते ठिबक सिंचनाद्वारे थोडीथोडी द्यावी. त्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करावा. झुकिनीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत नियंत्रित ओलावा असणे आवश्यक आहे. हवामानाला अनुसरून नियमित पाणी द्यावे. ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करावा.

आंतरमशागत

बियाण्याची उगवण होऊन चांगली वाढ झालेले एका जागी एकच रोप ठेवावे. तण काढून जमीन स्वच्छ ठेवावी. फळे खराब होऊ नये म्हणून त्यांचा ओल्या मातीशी संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी जमिनीवर गवताचा भाग ठेवून त्यावर फळ टेकवावे.

महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण

काकडीवर्गीय पिकाप्रमाणेच झुकिनी पिकावर मावा, लाल भुंगे, लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिआन फुले येण्याच्या अगोदर आणि फुले आल्यानंतर 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर प्रमाणे डिमेक्रॉन फवारावे. कीड लागलेली फळे काढून नष्ट करावीत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळयांचा (ट्रॅप्स) वापर करता येतो. लीफ मायनरच्या नियंत्रणासाठी सुरुवातीलाच डिमेक्रॉन या कीटकनाशकांचा वापर करावा. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाच्या चिकट सापळयांचा वापर करावा.

रोगांमध्ये केवडा, भुरी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. काही ठिकाणी जमिनीत ओलावा वाढल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. विषाणूमुळे होणाऱ्या केवडा रोगाने ग्रासलेली रोपे उपटून नष्ट करावी आणि मॅन्कोझेबची 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलिक्झीन 3 ते 4 किलो किंवा बाविस्टीन 10 ग्रॅम किंवा कॅराथेन 5 मिली. यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी. गंधकाची धुरळणी करू नये. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांच्या मुळाजवळ कॉपरऑक्सिक्लोराईड किंवा कॅपटान 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम प्रमाणे द्रावण करून त्याचप्रमाणे सुरुवातीस ट्रायकोडर्मा व्हीरीडी या जैविक बुरशीचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतांबरोबर करावा. रासायनिक कीटकनाशकाचा मशरूम पिकांवर वापर करावयाचा असल्यास तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञ यांचा सल्ला घेऊनच करावा, कारण बहुतांशी रासायनिक औषधांवर महाराष्ट्र शासनाने बंदी घालण्यात आलेली आहे.

काढणी आणि उत्पादन

फळे काढणीची वेळही त्यांचा वापर कशासाठी करावयाचा आहे त्यावर अवलंबून असते. सलाडसाठी वापरल्यास 10 – 12 सेंमी. लांबीची कोवळी फळे काढावीत. फळे जून झाल्यास त्यांचा कडकपणा वाढतो आणि चवही बिघडते. प्रक्रिया उद्योगासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार काढणीची वेळ ठरवावी.

सर्वसाधारण एक झाडापासून 10 – 14 आठवड्यांच्या कालावधीत काढणी केल्यास सरासरी 15 – 16 फळे मिळतात. फळांच्या वजनाला अनुसरून हेक्टरी जवळपास 4 – 5 टनांपर्यंत उत्पादन मिळते.

झुकिनीच्या फळांची साठवण 8 – 10 सेल्सिअस तापमान आणि 90 – 95% आर्द्रता असलेल्या साठवणगृहात 1 – 2 आठवड्यांपर्यंत करता येते.

झुकिनी हे नव्यानेच लागवड करण्यात येणारे काकडीवर्गीय पीक आहे. लागवडीसाठी मोठ्या शहरांच्या आसपास वाव आहे. लागवड बी टोकून किंवा पुनर्लागवड करून करता येते. हिरव्या आणि सोनेरी पिवळ्या रंगाच्या वाणाची लागवड करण्यात येते. याचा वापर सलाड आणि प्रक्रिया करण्यासाठी तसेच भाजीसाठी करता येतो. लागवड सरी पद्धतीने किंवा ठिबक सिंचनावर गादीवाफ्यावर करता येते. 10 – 14 आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक झाडापासून साधारण 15 – 16 फळांचे उत्पादन मिळते. या पिकाची लागवड शेड हाऊसमध्ये केल्यास चांगले उत्पादन मिळते.

झुकिनी हा उन्हाळ्यातील स्क्वॅशचा एक प्रकार आहे, याचा अर्थ फळाची त्वचा मऊ, खाण्यायोग्य असते. उन्हाळी स्क्वॅश झपाट्याने वाढत आहे आणि 35 दिवसांत काढता येते.

तसेच प्रति चौरस मीटर उत्पादित फळांची संख्या. पिकाची लागवड त्याच्या कोमल फळांसाठी केली जाते, जी शिजवलेल्या भाज्या म्हणून वापरण्यासाठी विविध आकार, रंग आणि आकारात उपलब्ध असतात.

बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी ही सर्वात सुरुवातीची काकडी आहे आणि त्याची लागवड बाजारपेठेजवळील भागात मर्यादित आहे.

गारपीट म्हणजे काय, ती ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?

राज्याच्या काही भागात गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंतय.

पावसाळ्यात गारपीट होणं आपल्यासाठी सवयीचं. पण, उन्हाळ्यात गारपीट होण्याचं प्रमाण का वाढलं आहे? यामागची कारणं काय हे आपण आता समजून घेणार आहोत.

काही वर्षांपूर्वी कदाचित वाटलं असतं हे असं कसं? पण 2014 साली मार्च महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली, पुढच्याही वर्षी हवामानाने तोच कित्ता गिरवला. त्या कालावधीत राज्याच्या अनेक भागात इतकी गारपीट होती झाली की गारांचा दीड-दीड फुटांचा थर साचला होता.

पिकांची हानी, घरांचं नुकसान, जनावरांचा मृत्यू असं मोठं नुकसानही झालं होतं. या गारपिटीबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एक ना दोन.. अनेक प्रश्न विचारले जात होते, शंका उपस्थित केल्या जात होत्या. जमेल तशी कारणं दिली जात होती.


पण आता वारंवार असं होऊ लागल्याने लोकही त्याला जणू सरावलेत. त्यामुळे आता गारपीट झाली तरी ‘असं होतंच बुवा..’ म्हणून सोडूनही देतील. तरीसुद्धा त्याच्या मुळाशी जावंच लागेल.

राज्यात गारपीट कधी होते?
गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा.

विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.

हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.

समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात – वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर.

ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.


गारा घडताना
या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.

हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं.

पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.

गारेच्या अंतरंगात डोकावताना

प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.

एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.

गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते.

आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.

एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं.

ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन.

एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.

हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!

उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान.

उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर परिणाम हा होतोच.भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बरोबर चारा टंचाईही निर्माण झाली आहे.

माणसाबरोबर जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते.परंतु पाण्याचे तापमान जास्त असेल तर जरुरीपेक्षा कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. यासाठी पाण्याची साठवण आणि पाणी पिण्याची व्यवस्था सावलीत करावी. शक्य असल्यास इतर मार्गानी पाणी थंड करून द्यावे. गायी-म्हशींना पाणी देताना ठराविक दोन आणि तीन वेळा पाणी पाजण्यापेक्षा दिवसभर पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे.

उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर परिणाम हा होतोच. वाढत्या तापमानामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्‍यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो. त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.

गोठा : गोठा मुक्त हवेशीर असावा व जनावरांची संख्या कमी असावी. प्रखर सूर्यप्रकाशापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यास चांगले छत असावे. गोठ्याचे छत टिनाचे किंवा पत्र्याचे असेल तर ते गरम होऊ नये, म्हणून कडबा किंवा गवताच्या पेंडीने झाकून ठेवल्यास टिन गरम होणार नाहीत. जनावर शक्यतो थंड जागी बांधून ठेवावीत, तसेच गोठा हवेशीर असावा. तसेच उन्हापासून व उष्ण वार्‍यापासून संरक्षण व्हावे याकरीता गोठ्याच्या भोवताली झाडे लावावीत. गोठ्यातून शेणाचा व मूत्राचा निचरा नियमित होईल याची काळजी घ्यावी.

प्रजननामध्ये या अडचणींचा सामना
उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे असे उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 30 टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.

अशी घ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने जनावरे आजारी पडणार नाहीत.

उष्माघातासाठी औषधोपचार : सनट्रोक, हिटस्ट्रोक यासाठी बर्‍याच वेळी घरगुती उपचार केल्यासही चांगला फायदा होतो. पाण्यात बर्फ टाकून, त्या थंड पाण्याने रोगी जनावर वारंवार धुवावे किंवा थंड पाण्याचा गोणपाट किंवा कापड भिजवून अंगावर ठेवावे. ज्यामुळे कातडीच्या खालील नसा आकुंचन पावतील व जनावराचे उष्माघातापासून संरक्षण होईल. पंख्यांची सोय असल्यास लावावे. रोगी जनावर थंड व मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी बांधावे. रोगी जनावराची कातडी चोळावी, जेणेकरून ताप कमी होईल व शरीराच्या वरच्या भागास थंड रक्त येईल. रोगी जनावरास खूप पाणी पिण्यास द्यावे. डोके, मान व पाठीचे मणके सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवावे. कांद्याचा रस ५० मिली अधिक १० ग्रॅम जिर्‍याची पूड अधिक ५० ग्रॅम खडीसाखर मिसळून पाजावे. हिरवे आंबे पाण्यात उकळून त्याचा गर व थोडे मीठ आणि साखर पाण्यात मिसळून पाजल्यास चांगला फायदा होतो.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन व्हा.जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

आता घरबसल्या करा आपले ड्रायव्हिंग लायसन्स रीनिव्ह ! पहा संपूर्ण प्रोसेस

गाडी चालवताना नियमांनुसार प्रत्येकाकडे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. चेंकिंगवेळी अनेकदा गाडीच्या RC, लायसन्ससह इतरही डॉक्युमेंट विचारले जातात. अनेकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) नसल्याने किंवा बाहेर पडताना ते सोबत नसल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो.

ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष वैध असतं आणि त्यानंतर ते रिन्यू करावं लागतं. ड्रायव्हिंग लायसन्स एका वर्षाच्या आत रिन्यू न केल्यास, नवं लायसन्स बनवावं लागू शकतं. नव्या लायसन्सवेळी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स वेळीच रिन्यू करणं गरजेचं (Driving Licence Renew) आहे. घरबसल्या सोप्या पद्धतीने ऑनलाईन ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

काही महिन्यांपूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत लायसन्ससंबंधी कॉन्टॅक्टलेस सर्विसेज सांगितल्या होत्या, ज्यात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअलसह आधार ऑथेंटिकेशनद्वारे फायदा घेतला जाऊ शकतो. आता लायसन्स रिन्यू करण्यासाठी RTO जाण्याची गरज नसून हे काम घरबसल्या करता येणार आहे.

मित्रानो आपण आता जाणून घेणार आहोत driving licence renew ची संपूर्ण प्रोसेस.


Driving licence renew साठी लागणारे कागदपत्रे

मूळ ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत जी नुतनीकरण करावयाची आहे.

चालकाचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, फॉर्म 1A सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

तुमचा पत्ता आणि वय सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची फोटोकॉपी.

200 अर्ज फी आणि पावती.

सर्वात आधी https://parivahan.gov.in/ यावर क्लिक करुन परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

-होमपेजवर ऑनलाईन सर्विसवर क्लिक करुन, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधित सर्विसेज सिलेक्ट करा.

– त्यानंतर नवीन पेजवर आपल्या राज्याचं नाव निवडावं लागेल.

– पुन्हा नवं पेज ओपन होईल, इथे ‘Apply for DL Renewal’ पर्याय निवडावा लागेल.

– अर्ज सबमिट करण्यासाठीचं एक पेज येईल, इथे अर्ज भरावा लागेल.

आता आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील.

– त्यानंतर एक फोटो आणि सही अपलोड करण्याचं सांगितलं जाईल.

– आता फी भरण्यासाठी सांगितलं जाईल आणि पेमेंट वेरिफाय करावं लागेल. फी भरल्यानंतर रिसिप्ट प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता.

Driving licence renew चे महत्व

वाहन मालक अपघात झाल्यास नुकसान भरपाईसाठी विम्याचा दावा करू शकतात, म्हणून परवाना आवश्यक आहे. कालबाह्य झालेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन चालवणारे वाहन मालक त्यांच्या विमा कंपनीकडे नुकसानीच्या दाव्याची पुर्तता करू शकत नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता असते आणि ती कालबाह्य झाल्यानंतरही एक महिन्यासाठी वैध असते. तथापि, कोणीही त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करू शकतो, कारण तो दंड भरून कालबाह्य झाला आहे. टीप: जर ड्रायव्हरचा परवाना त्याच्या एक्सपायरी तारखेच्या 5 वर्षांच्या आत नूतनीकरण केला गेला नाही, तर कार मालकाला नवीनसाठी अर्ज करावा लागेल, कारण जुना वैध ठरणार नाही.

आता नाशिक होणार बीअरची राजधानी! दोन मित्रांनी एकत्र येऊन कारखाना उभारला!

नाशिक हे एक नाही तर अनेक गोष्टींसाठी फेमस आहे. वाईन कांदा चिवडा,द्राक्षे यांनी नाशिकची नवी ओळख निर्माण केली आहे. जगाच्या नकाशावर या गोष्टींसाठी नाशिक ओळखल जातं. वाईन कॅपिटल बरोबरच बिअर कॅपिटल म्हणून देखील नाशिकची नवी ओळख निर्माण होणार आहे. अभिषेक पाटील आणि जय पाटील या दोन मित्रांनी एकत्रित येत नाशिक जिल्ह्यात बिअर निर्मितीचा कारखाना उभारला आहे.

आठ प्रकारच्या युरोपियन बिअरचे उत्पादन
नाशिक शहराजवळील विल्होळी परिसरात टोपची नावाचा हा बिअर निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या ही बिअर संशोधन आणि विकास तत्त्वावर तयार आणि वितरित केली जात आहे. विविध प्रकारच्या धान्यापासून सुमारे आठ प्रकारची युरोपियन बिअर तयार केली जाते.

सध्या सर्वात लोकप्रिय बिअर आहेत बेल्जियन विट, क्रीम आले, अंबर आले. अनेक नाशिककर तसेच बाहेरील बिअरप्रेमी टोपची येथे येतात आणि त्याचा आस्वाद घेतात. त्यांना सरकारने अद्याप पॅकेजिंगची परवानगी दिलेली नाही. पण आपण पार्सलने किंवा तिथे जाऊन बिअर घेऊ शकतो.

ते म्हणाले कि, आता गेल्या सहा ते सात वर्षांपासून आम्ही हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्यात अनेक अडचणी आल्या. पण, आम्ही बिअर कारखाना हटवण्यावर ठाम होतो. आम्ही अनेक वर्षांपासून वाईन क्षेत्रात काम करत आहोत. त्यामुळे आपणच काहीतरी करायला हवे होते. आमच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आमच्याकडे सध्या युरोपियन बिअर आहेत. मात्र भविष्यात आम्ही ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन बीअर आणि वाईन तयार करण्याचा प्रयत्न करू.

नाशिकमध्ये का?
ते म्हणाले, ‘नाशिकच्या हवामानाचा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये वाईन आणि बिअर उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आहे. द्राक्षे तसेच तृणधान्यांचे विविध प्रकार आहेत. जेणेकरून त्याचे उत्पादन चांगले होऊ शकेल. आम्ही ज्या धान्यापासून बीअर तयार करतो त्या धान्यासाठी प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये आमच्याकडे प्रवेश नाही. त्यामुळे परदेशातून आयात करावी लागते. भविष्यातही ही प्रक्रिया येथे करण्याचा प्रयत्न करू.

देशात उन्हाळी हंगामात कोणती पिके घेतली जातात, उन्हाळ्यात शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत?

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशातील 90 टक्केपेक्षा जास्त जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये स्नॅप बीन्स, कॉर्न, काकडी, सेलेरी (थंड हवामान), एडामामे, वांगी, कस्तुरी, भेंडी,मिरची, टमाटो,कलिंगड, भोपळे, रताळे (दीर्घ, गरम, दंवमुक्त हंगाम आवश्यक), टोमॅटिलो, झुचीनी, खरबूज, मिरी, टोमॅटो यांचा समावेश होतो. , आणि स्क्वॅश

वाल, कारली, दोडकी, भोपळा, पालक भाजीपाला पिके भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बीजद्वारे व लांब अंतर ठेवून केली जावी. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे आहे.

उत्तम, चांगल्या उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या साह्याने आधार द्यावा. कारली, दुधी भोपळा, दोडका ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून, वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.

आधारासाठी सिडनेट, मंडप किंवा ताटी पद्धत वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ ते ६ फूट उंचीवर वाढतात. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते.

हवा आणि सूर्यप्रकाशसारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी ही कामे सुलभ होतात.

दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी सुलभ होते. कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे सोईस्कर असते.

वेलवर्गीय पिकांना वेळच्या वेळी पाणी द्यावे. वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी. गरजेप्रमाणे खत द्यावे.मिरची, वांगी आणि टोमॅटो या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी.

उन्हाळी हंगामात अनेक प्रकारची शेती केली जाते, प्रत्येक मातीत विविध प्रकारची शेती केली जाते, काही शेती अशी असते की, ही शेती कोणत्या हंगामात केली जाते हे प्रत्येक शेतकरी बांधवांना माहीतही नसते. उन्हाळ्यात केल्या जाणार्‍या प्रत्येक प्रकारच्या शेतीबद्दल सांगा, कोणती शेती केली जाते आणि कोणती शेती कधीपर्यंत केली जाते आणि मी तुम्हाला उन्हाळी पिकाशी संबंधित सर्व माहिती आपल्याला या लेखातून मिळणार आहे.साधारणतः आपल्या देशामध्ये पिकांचे 2 वेगवेगळे हंगाम असतात त्यामध्ये रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम. या दोन्ही हंगामात वेग वेगवेगळी पिके घेतली जातात. कारण ज्या त्या हंगामात ज्या त्या पिकाला पोषक हवामान आणि वातावरण मिळत असते.आपल्या राज्यात अनेक असे जिल्हे आहेत जे सदा कोरडे असतात त्यामध्ये विदर्भ, गडचिरोली, लातूर यांचा समावेश आहे. बऱ्याच वेळा रब्बी आणि खरीप हंगाम उरकल्यावर उन्हाळ्यात कोणती पिके करावीत याचा विचार करत असतो.उन्हाळ्यात अशी पिके करावीत की जी आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न काढून देतील.

1) कलिंगड:-
उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडाच्या पिकाचा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो. शिवाय उन्हाळ्यात कलिंगडाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा असते. आणि बाजारात भाव सुद्धा चांगला मिळतो या साठी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शेतामध्ये कलिंगड किंवा खरबूज ची लागवड करून भरघोस फायदा मिळवावा.

2) हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या:-
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असते त्यामुळे उन्हाळ्यात शेतामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे उत्पन घेणे फायदेशीर ठरते शिवाय भाजीपाल्याचा कालावधी हा 1 ते दीड महिन्यांपर्यंत असल्यामुळे कमी वेळात जास्त पैसे मिळतात. उन्हाळ्यात शेतामध्ये मेथी, शेपू, चाकवत, पालक आणि कोथिंबीर यांची लागण करावी. याचबरोबर काही फळभाज्या सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देतात. यामध्ये दोडका,टोमॅटो, कारले काकडी आणि भोपळा यांची लागवड करून भरघोस उत्पन मिळवू शकतो.


3) मिरची:-

उन्हाळ्यात सर्वात जास्त भाव खाते ती म्हणजे मिरची. मिरचीला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असल्यामुळे दरात मोठी वाढ होते तसेच मिरचीचा कालावधी हा 5 महिन्यांपासून 3 वर्ष एवढा असतो. उन्हाळ्यात हिरव्या आणि लाल मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

4)ऊस:-

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. कारण उसामधून आपण हुकमी उत्पन्न मिळवू शकतो शिवाय उसाचा कालावधी हा 12 महिने असला तरी यातून आपल्याला चांगले उत्पन्न मिळते.

5)उन्हाळी मूग आणि उन्हाळी कांदा:-

ही दोन्ही पिके उन्हाळ्याच्या मध्य काळात घेतली जातात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर घेतली जातात. उन्हाळी मुगाला आणि कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणात भाव मिळतो शिवाय मुगाला अत्यंत कमी कष्ट लागतात त्यामुळे शेतकरी वर्गाला ही पिके चांगली परवडतात.

6) कोथिंबीर

कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्‍यात केली जाते. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ट स्‍वादयुक्‍त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. उन्‍हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्‍पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्‍यामुळे कोथिंबीरीच्‍या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्‍वाची पालेभाजी आहे. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ठ स्‍वादयुक्‍त पानावर इतर भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्‍ये कोथिंबीरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबीरीच्‍या वडया चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

Post office ची नवीन योजना; फक्त ६ रुपये गुंतवा अन् १ लाख मिळवा.मुलांचे भविष्य करा सुरक्षित!

गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. यातच आता पोस्ट ऑफिसने लहान मुलांसाठी एक वीमा योजना आणली असून, कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळू शकतो.

आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे, असे सर्वच पालकांना वाटत असते. आताच्या घडीला देशात अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र, लहान मुलांसाठी देशातील विश्वासार्ह असलेल्या पोस्ट ऑफिने एक पॉलिसी आणली आहे. यामध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य तर सुरक्षित होतेच, तसेच पालकांना चांगला परतावा मिळतो, ज्याच्या मदतीने ते मुलांचे शिक्षण, लग्न यांसारखे मोठे खर्च सहज भागवू शकतात. तुम्ही छोटीशी गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव बाल जीवन विमा असे आहे.

पोस्ट ऑफिसची बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. या योजनेंतर्गत ५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो. कोणताही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी हा विमा घेऊ शकतो. योजना घेताना पालकांचे कमाल वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. ही पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. पॉलिसी स्वीकारल्यापासून मुलाला संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. पॉलिसी घेतल्यानंतर पालकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर विमा रकमेसह बोनसची रक्कम दिली जाते.

फक्त ६ रुपयांची गुंवतणूक करा अन् १ लाख रुपयांचा परतावा मिळवा

बाल जीवन विमा योजनेंतर्गत, मुलांसाठी प्रतिदिन ६ रुपये ते १८ रुपयांपर्यंतचा प्रीमियम जमा करू शकता. जर एखाद्या पॉलिसीधारकाने ही पॉलिसी ५ वर्षांसाठी खरेदी केली तर त्याला दररोज ६ रुपये प्रीमियम भरावा लागेल. परंतु ही पॉलिसी २० वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केली असल्यास, १८ रुपये दैनिक प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर १ लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते.

विमा संरक्षण किती आणि काय फायदा होऊ शकेल?

पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम पेमेंटचा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विम्यामध्ये १००० रुपयांच्या विमा रकमेवर प्रति वर्ष ५२ रुपये बोनस दिला जातो. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बाल जीवन विमा मिळवू शकता.

मित्रानो माहिती आवडली असेल तर आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये सामील व्हा

ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आणि लिंक नसेल तर लगेच करून घ्या लिंक

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख होती पण नंतर आयकर विभागाने वाढून दिली आहे तुम्ही जर अद्याप ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास घरबसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करू शकता.

आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (Pan-Aadhar Link) करणे बंधनकारक केले आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अखेरची मुदत दिलेली होती पण लिंक करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.या मुदतीत हे काम केले नाही तर तुमचे पॅन सक्रिय राहणार नाही.

पॅनला आधारशी लिंक (Pan-Aadhar Link) करणे अनिवार्य आहे. प्राप्तिकर विभागाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, अंतिम तारीख लवकरच येत आहे. उशीर करू नका, आजच पॅनला आधारशी लिंक करा. 31 मार्च 2023 पर्यंत लिंक न केल्यास पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल. तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकत नसाल तर तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही किंवा पॅन संबंधित सेवा वापरू शकणार नाही. तसेच विमा किंवा म्युच्युअल फंड खरेदी करू शकणार नाही.

पॅन कार्ड वैध राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये http://www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.याआधी देखील सरकारने कागदपत्रं लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवली आहे. त्यामुळे ही प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण गरजेचे आहे.

माहिती आवडली असेल तर आमच्या whats app ग्रूप मध्ये सामील व्हा

व्हॉट्स ॲप ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

Design a site like this with WordPress.com
Get started