ग्राम पंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या आहेत असे पहा आपल्या मोबाईल वरच

पंचायत समिती ग्रामपंचायत च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये घरकुलाची योजना असतील फळबागांच्या लागवडी असतील. सलग वृक्ष लागवड असेल किंवा बांधावरील असेल शेतकऱ्यांना गाय म्हैस घेण्यासाठी अनुदान असेल.

सिंचन विहिरीसाठी अनुदान असेल किंवा पानंद रस्त्याची काम असतील. अशा प्रकारचे विविध अशी काम असे एखाद्या योजनेबद्दल माहिती घेतल्यानंतर. बरच काही एकमेकांच्या माध्यमातून सांगितलं जातं.

लाभार्थ्यांना लाभ मिळतो आणि मित्रांनो मग नेमका हा लाभ कोणाला मिळतो. हा देखील सर्वांना प्रश्न पडतो आपल्या जाता येईल योजना आपल्या जिल्ह्यामध्ये किती सिंचन विहिरी दिल्या जातात. किती गायगोटे दिल्या जातात ही माहिती सुद्धा पण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो.

गावामध्ये नेमक्या कोणते योजना सुरू आहेत. कोण त्याचे लाभार्थी आहेत ही सर्व माहिती कशाप्रकारे पहायची याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला नरेगाच्या वेबसाईट वरती जायचे ज्याचे डायरेक्ट लिंक आपल्याला narega.nic.in याच्यावरती आल्यानंतर आपण पाहू शकता.

आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे योजनांचे कोण कोण व्यक्ती लाभ घेतात तसेच कोणकोणत्या योजना येतात हे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे असते. बऱ्याच शेतकरी माहिती अभावी योजनांपासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशा पद्धतीने पाहिजे हे आपण आता सविस्तर पाहूयात

अशी पहा महात्मा गांधी रोजगार हमी योजनांच्या कामाची यादी
सुरुवातीला आपल्याला मनरेगाच्या (MRGS) वेबसाईटवर https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 जायचे तिथे गेल्यावर ती आपल्याला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशा पद्धतीचे काही पर्याय दिसतील यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत जे ऑप्शन असेल त्यावर ती क्लिक करायचे आहे. पुढे यादी पाहण्यासाठी त्या ठिकाणी जनरेट रिपोर्ट वरती क्लिक करायचे.
Grampanchayat Work List


पुढे एक पेज ओपन होईल त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट करायचे त्यानंतर पुढे रिपोर्ट ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वार्षिक वर्ष म्हणजे 2022 -23 आपल्याला ज्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष आपल्याला त्या ठिकाणी सेट करायचा आहे.
त्यानंतर पुढे जिल्ह्याची यादी दिसेल त्या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा, तालुका, आपले गाव निवडायचे आहे. तालुका निवडल्यानंतर तालुक्यात असलेले ग्रामपंचायत Grampanchayat Work दाखवल्या जातील. त्या ठिकाणी ग्रामपंचायत चे लाभारती यादी पाहिजे असल्यास त्यापैकी ग्रामपंचायत यादी तुम्ही सेट करू शकता. (gram panchayat work report online)
पुढे प्रोसिड नावाच एक पर्याय मिळेल त्यावर ती क्लिक करा. त्यानंतर डेटा सपोर्ट दाखवला जाईल यामध्ये R5 कोलम च्या खाली लिस्ट ऑफ ओर्क (List Of Work) ऑप्शन असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. पुढे कामाचा वर्ग पर्याय असेल त्यातून आपल्याला कोणती योजना पाहिजे आहे किंवा आपण त्याला ऑल सलेक्ट करून सर्व योजना पाहू शकता. त्यापुढे वर्क स्टेटस ऑप्शन येईल त्यामध्ये पण आपल्याला ऑल ऑप्शन निवडू शकता. (gram panchayat work report)

पुढे 2022-23 निवडायचे आहे. म्हणजे आपल्याला ज्या वर्षाची यादी पाहिजे आहे ते वर्ष पण आपण निवडू शकता. त्यापुढे आपल्या गावा मधील योजनांची यादी आपल्या समोर दिसेल त्यामध्ये कोणा कोणाला योजना मंजूर झाले आहेत. त्यांची नावे तसेच कोणत्या योजना मंजूर झाले आहे त्या योजनेचे नाव त्या ठिकाणी असेल. कामाचा प्रकार काम कशाप्रकारे चालू आहे. nrega कामाची सद्यस्थिती वर्ष आणि कुठल्या विभागाच्या अंतर्गत काम चालू आहे. याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहवयास मिळेल. म्हणजेच उदाहरणार्थ गायगोठा असेल किंवा नवीन सिंचन विहीर असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा शेततळे असेल अशा प्रकारे योजना ची लिस्ट या ठिकाणी आपल्याला दिसेल.

मित्रानो माहिती आवडली असेल तर आमच्या whats app ग्रूप मध्ये सामील व्हा

ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

कुक्कुट पालन योजना 2023: ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती.

भारतातील रहिवाशांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबवित आहे. भारत सरकारने ज्याप्रमाणे पशुधन व मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन दिलेआहे, त्याचप्रमाणे कुक्कुटपालना संबंधीत महत्वाच्या योजना राबवण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे.

अंडी आणि कोंबड्यांची मागणी बाजारात सतत वाढत आहे, मागणी वाढल्यामुळे कोंबडी पालन देखील एक महत्वाचा उद्योग म्हणून उदयास आला आहे. मागणीतील ही वाढ पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कुक्कुट पालन योजना 2023 देखील सुरू केली असून त्याद्वारे ते राज्यातील लोकांना कोंबडी पालनासाठी प्रोत्साहित करत आहेत.

कुक्कुटपालन अनुदाना करता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवली जाणारी ही एक महत्त्वाचे योजना आहे. या योजनेचे नाव आहे सदन कुक्कुटपालन विकास योजना याच योजना चे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री योजनेस भारतात नाबार्डने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या योजनेंतर्गत राज्यात नवनवीन पोल्ट्री फार्मची स्थापना केली जात आहे. राज्य सरकार राज्यातील लोकांना कुक्कुट पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील करते.

या योजनेच्या मदतीने राज्यात बेरोजगारीचे दर कमी होण्यास मदत होईल. सर्वांना ठाऊक आहे की मास मिळवण्याच्या उद्देशाने ब्रोयलर्स कोंबड्यांना वाढविले जाते तर अंडी देण्याच्या उद्देशाने लेअर्स कोंबड्या पाळल्या जातात.

कुक्कुट पालन योजना 2023 ची उद्दिष्टे

राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेमुळे महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल. म्हणूनच या योजनेंतर्गत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात रोजगार निर्मिती होईल.

कुक्कुट पालन योजना 2023 चे फायदे

  • पोल्ट्री पालन सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते.
  • कुक्कुटपालनामुळे केवळ व्यक्तींनाच रोजगार मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नातही हातभार लागला आहे. भारतात सुमारे 3000 दशलक्ष शेतकरी आहेत जे कुक्कुट पालन (Kukut Palan Yojana Maharashtra) करतात. आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 26000 कोटींचे योगदान देत आहेत.
  • कुक्कुट पालन हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.
  • या व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचीही बचत होऊ शकते.
  • कोंबडी पालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकते.
  • पोल्ट्री हा एक अत्यंत सोपी व्यवसाय आहे.
  • कुक्कुटपालनासाठी परवाना देखील आवश्यक नाही.
  • कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते.

कुक्कुट पालन योजना 2023 ची उद्दिष्टे
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेमुळे महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल. म्हणूनच या योजनेंतर्गत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात रोजगार निर्मिती होईल.

कुक्कुट पालन योजना 2023 चे फायदे
पोल्ट्री पालन सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते.
कुक्कुटपालनामुळे केवळ व्यक्तींनाच रोजगार मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नातही हातभार लागला आहे. भारतात सुमारे 3000 दशलक्ष शेतकरी आहेत जे कुक्कुट पालन करतात. आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 26000 कोटींचे योगदान देत आहेत.
कुक्कुट पालन हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.
या व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचीही बचत होऊ शकते.
कोंबडी पालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकते.
पोल्ट्री हा एक अत्यंत सोपी व्यवसाय आहे.
कुक्कुटपालनासाठी परवाना देखील आवश्यक नाही.
कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते.

कूकुट पालन योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्डाची प्रत
कायमचा रहिवासी पुरावा
मतदार ओळखपत्र
रेशन कार्ड
जमीन नोंद (सातबारा)
बँकेचा तपशील (पासबूक ची झेरॉक्स)
बँक स्टेटमेन्टची प्रत
प्रकल्प अहवाल

कुकुट पालन योजना 2023 साठी पात्रता

  • या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतात.
  • या योजनेंतर्गत केवळ शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत.
  • संघटित आणि असंघटित क्षेत्रांचे गट पात्र आहेत.
  • अशासकीय संस्था देखील पात्र आहेत.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा उद्योजक असणे आवश्यक आहे.
  • ज्या कोणालाही हा व्यवसाय करायचा आहे त्याला या व्यवसायात पुरेसा अनुभव असावा.
  • हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी.
  • 2023
  • कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 25% पर्यंत अनुदान दिले जाते.
  • अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 35% पर्यंत अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे कसा करावा ?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पशुसंवर्धन उपायुक्त तसेच पशुसंवर्धन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी भेटून सविस्तर माहिती मिळवू शकता.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना एका कुटुंबाला मिळणार १.५ लाखापर्यंत पर्यंतचा विमा; अर्ज कुठे कसा करायचा.

केंद्र आणि राज्य सरकार जनतेसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असते.जनतेला कश्या प्रकारे सोयी सुविधा देता येतील याकडे सरकारचे विशेष लक्ष असते.

केंद्र सरकारनं सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारनं महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना असं ठेवलं. या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे



केंद्र सरकारनं सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारनं महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना असं ठेवलं. या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी http://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत 93884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

योजनेत समाविष्ट उपचार

योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

सर्वसाधारण शस्त्रक्रिया
काम, नाक घसा शस्त्रक्रिया
नेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोठ व जठार शस्त्रक्रिया
कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रिया
प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतूविकृती शास्त्र
कर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार
रेडीओथेरपी कर्करोग
त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत
पॉलिट्रामा
प्रोस्थेसिस
जोखिमी देखभाल
जनरल मेडिसिन
संसर्गजन्य रोग
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
हृदयरोग
नेफ्रोलोजी
न्युरोलोजी
पल्मोनोलोजी
चर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजी
इंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
इंटरवेन्शनल रेडीओलोजी
४. विम्याचा हप्ता- या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो

५. योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये – या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो.

६. नि:शुल्क (Cashless Medical Services):- सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२ उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत.

७. आरोग्य मित्र:- अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.

८ आरोग्य शिबीर:- योजेनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांत रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी उपचारांस सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.

९. राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद:- योजनेच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात तसेच यावर नियंत्रक म्हणून मा. मुख्य मंत्री. राज्य यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्यरत आहे.

१० विमा कंपनी आणि व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या:- योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्सुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्याची (TPAs) निवड केलेली असून त्यांचा मार्फत अंगीकृत रुग्णालयांची निवड, उपचारांच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतात.

गाय गोठा अनुदान योजना 2023 ; आजच करा अर्ज मिळणार हमखास अनुदान

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा.महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.शासनाकडून शेतकऱ्यांच्या फायदा करिता तसेच त्यांचे उत्पन्नामध्ये भर व्हावी याकरिता अनेक योजना राबविल्या जातात.त्या सर्व योजनांपैकी एक योजना म्हणजे गाय गोठा अनुदान योजना आहे,या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना देण्यात येणार आहे अनेक योजना ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीकरिता उपाय कारक आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर व्हावी त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत हवी, त्यामुळे शेळीपालनावर अनुदान देणे शेती विषयी अवजारांवर अनुदान देणे, अशा विविध योजना अंतर्गत शासन शेतकऱ्यांना पुढील येण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करते.

सरकारने राबविण्यात आलेली आहे, काय कुठे अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळवा कारण गाय पालन करणारा गाईचे पालन करणारा त्याला शक्य नसते की तो चांगला कोठा गाईसाठी बांधू शकेल, त्यामुळे जनावरांना पाण्या पावसापासून वाचवण्याकरता गोठा आवश्यक असतो परंतु पशुपालक गोठा बांधू शकत नाही, कारण कोठे वाढण्याकरिता पैसे लागते, कोटा बंद करता लागणारा खर्च जास्त असल्यामुळे तो पत्ता गोठा बांधू शकत नाही व त्यामुळे जनावरांना सर्व ऋतूंना दोन देऊन जगावे लागते, अंतर्गत 70 हजार रुपये अनुदान दिले जाते .त्यामुळे गाईंसाठी गोठा असणे आवश्यक आहे गाईंचे रक्षण होईल त्यांना पाणी पावसापासून संरक्षण मिळेल,थंडीपासून संरक्षण मिळेल, त्याचप्रमाणे त्यांना गाईच्या आजारांपासून सुद्धा संरक्षण मिळेल त्यामुळे पशुपालकाला जास्त टेन्शन असणार नाही कारण प्राण्यांवर अनेक प्रकारची रोगी आलेली असतात ती पाण्यामुळे येतात त्यामुळे घोटाळा हा स्वच्छ असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे तो बांधून टाकून असलेला हवा त्यामुळे शासनाने ही गाय गोठा योजना राबविण्यात आलेली आहे.

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर  जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.

योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना
योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१
विभाग कृषी विभाग
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
लाभ जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
गाय गोठा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न डब्बल करणे.

गाय गोठा योजनेचा उद्देश

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये

  • महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

गाय गोठा योजनेच्या पात्रता व अटी

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

अर्जदाराकडे असलेल्या उपलब्ध पेशींचे जीपीएस करणे आवश्यक आहे

ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे

या अंगणात स्वतंत्र अर्ज करावा लागेल

सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच लाभ मिळेल
गाय गोठा अनुदान योजना 2023 ची पात्रता
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
अर्जदाराकडे असलेल्या उपलब्ध पेशींचे जीपीएस करणे आवश्यक आहे

ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे


सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच लाभ मिळेल


Doलाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे
रेशन कार्ड

आधार कार्ड

मोबाईल नंबर

रहिवासी दाखला

अधिवास प्रमाणपत्र

पंचायत शिफारस पत्र

उत्पन्नाचा दाखला

अर्जदार शेतकरी असावा

जॉब कार्ड

संमती पत्र

जातीचा दाखला

गाय गोठा योजनेसाठी अर्ज कसा भरावा  

सर्वप्रथम अर्जदाराने ग्रामपंचायतीमधून योजनेचा अर्ज आणावा.त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा आवश्यक ती कागदपत्रे वरील प्रमाणे दाखवलेली आहे, ती कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करा. व अर्ज सादर केल्यावर तुमच्या अर्ज तपासण्यात येईल, त्यामध्ये जर तुम्ही या योजनेची लाभार्थी असाल तर तुम्ही तो अर्ज छाननी होईल, त्याआधी तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पोचपावती घ्यावी लागेल ती पोचपावती घ्या व अर्ज पूर्ण होईल.

ही आहे पद्मश्री पुरस्कार विजेती. तिला सीड मदर असे ही म्हणतात.११४ वाणाचे बियाणे तयार केलेत.

सायनिक खतांच्या व औषधांच्या माऱ्यामुळे भाजीपाला अन‌् अन्नधान्यामध्ये रासायनिक मात्रा आढळून येत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ग्राहक सेंद्रिय भाजीपाल्याकडे वळत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना नियमित भाजीपाला खरेदी करावा लागतो.

अनेक पिकांची देशी वाणं काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. राहीबाई ते जतन करण्याचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे.

कोंभाळणे हे अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील एक आदिवासी खेडेगाव. गावाच्या एका टोकाला आदिवासी शेतकऱ्यांचे एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. घराच्या मागील डोंगरावर कथित विकास दर्शविणारी भिरभिरणारी पवनचक्क्यांची पाती, घराच्या एका बाजूला उतरत्या छपराचा गोठा, त्यात चार-पाच म्हशी. दुसऱ्या बाजूला अशाच उतरत्या छपराची एक खोली. त्या खोलीत प्रवेश करताच समोर जे दिसते ते पाहून कोणीही आश्चर्यचकित होते. पारंपरिक पद्धतीचे गाडगे, मडके, प्लास्टिकचे टीप, बाटल्या, प्लास्टिकच्या चौकोनी पेटय़ा ओळीने मांडून ठेवलेल्या. त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची बियाणे ठेवलेली. ही आहे राहिबाई सोमा पोपेरे (वय ५५) या आदिवासी महिलेची बियाणे बँक. विविध प्रकारच्या ५३ पिकांचे ११४ वाणांचे बियाणे येथे आहेत. हे सर्व गावरान बियाणे आदिवासींनी परंपरेने जपलेले. हे घर म्हणजे राहिबाईंचे ‘रिसर्च सेंटर’च आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता.

राहिबाईंचे माहेर कोंभाळणे गावातलेच. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. अनेक वष्रे घर आणि शेत याशिवाय त्यांना दुसरे काही माहीत नव्हते. त्यांच्या सासऱ्याचा दराराच इतका होता की, दुसऱ्याशी बोलायचीही हिंमत नसे. राहिबाई निरक्षर आहेत. लहानपणी शिक्षण मिळाले नाही, पण वडिलांकडून खूप ज्ञान मिळाले,असे त्या सांगतात. परंपरेने आलेले निसर्गाबद्दलचे हे ज्ञान त्यांनी जोपासले, वाढवले. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या. सुमारे दशकभरापूर्वी ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे १७ पिकांचे ४८ प्रकारचे वाण होते. पुढे ‘बायफ’च्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज राहिबाईंच्या बियाणे बँकेत ५३ पिकांचे ११४ वाण आहेत.

कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी १० पिकांचे ३५ वाण. भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्याच्या सहा पिकांचे ३४ वाण. गळीत धान्यांमध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या ५ पिकांचे ११ वाण. विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील २६ पिकांचे ३२ वाण. रानभाज्यांमध्ये ६ प्रकारचे कंदांचे १२ वाण. शिवाय त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच-तीन एकर परिसरांत विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक वाणाची वैशिष्टय़े, उपयोग याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. एखाद्या वाणाबद्दल विचारल्यानंतर ते कुठून आणले? ते औषधी आहे की नाही? त्याचा उपयोग काय? कुठे येते? अशी सर्व माहिती त्या सहजतेने सांगतात. हे ऐकल्यानंतर निरक्षर राहिबाई या बियाणांचा ज्ञानकोश असल्याची खात्री पटते. घराच्या परिसरातही त्यांनी विविध प्रकारच्या वनस्पतींची जोपासना केली आहे. त्यात फळझाडे, भाज्या, वेल यांचा समावेश आहे. हा सर्व परिसर हलक्या प्रतीच्या जमिनीचा. ही झाडे कधी सांडपाण्यावर, तर कधी डोक्यावर पाणी वाहून, कधी बलगाडीने पाणी वाहून त्यांनी जगविली. उन्हाळ्यात झाडांचा बचाव करण्यासाठी स्टोन मन्चिंग (दगडांचे आच्छादन) तंत्राचा त्यांनी वापर केला. परिसरातील डोंगरावरून गारगोटय़ा गोळा करून त्या झाडाच्या खोडाभोवती पसरवायच्या. त्यामुळे झाडाला घातलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. झाडाभोवती गारवा टिकून राहतो. तेथे गवत उगवत नाही, झाडाला उधई लागत नाही. परंपरेने आलेल्या अशा अनेक गोष्टी राहिबाईंकडे आहेत. विशेष म्हणजे या सर्व झाडांची जोपासना सेंद्रिय पद्धतीने केली जाते.

वेगवेगळ्या पिकांसंदर्भात, बियाणांसंदर्भात आलेले ज्ञान राहिबाईंनी जपले, जोपासले, वाढवले आणि आता त्याच्या प्रसारासाठी त्या झटत आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागांत पोहोचले आहेत. काही वर्षांपूर्वी जी महिला दुसऱ्या माणसाशी बोलायला घाबरायची, तीच महिला आज पारंपरिक वाणांची महती सांगत आहे. पारंपरिक वाणांचा प्रसार हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे.

अकोल्यासह जुन्नर, संगमनेर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत लोकपंचायत या संस्थेने केलेल्या कृषी जैवविविधता सर्वेक्षणानुसार या चार तालुक्यांत आदिवासी भागात आजही ५० टक्के शेतकरी गावरान बियाणांचा वापर करतात. ४१ टक्के शेतकरी गावरान वाणांची लागवड घरगुती वापरासाठी करतात, तर ३६ टक्के शेतकरी बाजारात विक्रीसाठी करतात. उर्वरित २१ टक्के शेतकरी दोन्ही कारणांसाठी लागवड करतात. अति पावसाच्या प्रदेशात आजही स्थानिक वाणांना बऱ्यापकी प्राधान्य दिले जात आहे.

हे गावरान वाण टिकवण्यात आदिवासी महिलांचा मोठा वाटा आहे. राहिबाई पोपेरे ही या सर्व आदिवासी महिलांचा ‘चेहरा’ आहे असे म्हणता येईल.

देशी वाणांची आगळी वेगळी चळवळ

काही वर्षांपूर्वी हळदीकुंकवात राहिबाईंनी वाण म्हणून झाडांची रोपे द्यायला सुरुवात केली. आपल्या रोपवाटिकेत तयार केलेली पाचशे-सहाशे रोपे त्या दरवर्षी वाटत असतात. डांगी जनावरे हे या परिसराचे एक वैशिष्टय़, पण त्यावरील लोकांचे आकर्षण कमी होऊ लागले होते. राहिबाईंनी या गावात डांगी जनावरांचा पोळा सुरू केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ममताबाई भांगरे (देवगाव), शांताबाई धांडे (आंबेवंगण), जनाबाई भांगरे (जायनावाडी), हिराबाई गभाले (मान्हेरे), सोनाबाई भांगरे (िपपळदरावाडी) अशा अनेक महिला त्यांच्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. एक वेगळीच चळवळ राहिबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अकोले तालुक्याचा आदिवासी भाग हा देशी वाणांचे आगर आहे. संकरित बियाणांच्या आक्रमणापुढे हे देशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र आता त्यांच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यांचा ह्या वाखाडण्याजोगी कलेची दाखल सरकारने घेतली आणि राहीबाई यांना पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. राहिबाई यांना बीबीसी१०० प्रभावशाली महिला पुरस्कार २०१८साली मिळाला.तसेच त्यांना २०१९ मध्ये नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.

समाजात राहिबाई यांचे काम बाकी महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

पुण्याच्या ऊस उत्पादक शेतकरी उसापासून तयार केली कुल्फी, करताय लाखोंची कमाई

उस हे राज्यात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. मात्र हे बागायती पीक शेतकऱ्यांसाठी अलीकडे डोकेदुखी सिद्ध झाले आहे. ऊस वेळेवर कारखान्यात जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच कारखान्याकडून वेळेवर एफ आर पी दिली जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी सहन करावी लागत आहे. एवढेच नाही तर ऊसतोड मजुरांकडून आणि वाहतूकदारांकडून देखील शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.

ऊसतोड मजूर आणि वाहतूकदार शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे मागत आहेत. या सर्व कारणांनी आता ऊस बागायतारांनी उसातला पर्याय पिकाची शोधाशोध सुरू केली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी गटाने ऊसाला पर्याय पीक शोधण्याऐवजी उसापासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार करून ऊस शेती फायदेशीर करून दाखवली आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या मौजे आलेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येत एका शेतकरी ग्रुपची स्थापना केली. मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप असे या ग्रुपला नाव देण्यात आलं. या शेतकरी ग्रुप मधील प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे.

आजपर्यंत आपण ऊसापासून साखर, गूळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल परंतु ऊसापासून कुल्फी बनवलेली पाहिली आहे का? होय फक्त कुल्फीच नाही तर ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे.

कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे. दौंड (Daund) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ग्रुपने ऊसापासून हे सगळे पदार्थ बनवले आहेत. ऊसापासून तयार केलेल्या या सगळ्या उपपदार्थांवर नागरिक चांगलेच फिदा झाले आहेत.

म्हणजेच मूल्यवर्धित पदार्थ देखील पारंपारिक न बनवता बाजारात मागणीमध्ये असलेले मूल्यवर्धित पदार्थ या ग्रुपने बनवून दाखवले आहेत. विशेष बाब अशी की या ग्रुपने तयार केलेल्या कुल्फीला बाजारात मोठी मागणी असून दहा रुपये प्रति नग याप्रमाणे स्वतः आउटलेट लावून या शेतकरी गटाच्या माध्यमातून कुल्फी विक्री होत आहे. यामुळे या गटाला यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाकाठी एक हजार रुपयाची सध्या स्थितीला कमाई होत आहे.

या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुल्फी आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. यानंतर मशिनरी च्या माध्यमातून कुल्फी तयार केली जाते. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला असून ही कुल्फी आरोग्यदायी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गुल्फी तयार करण्यासाठी आवश्यक मशिनरी आयआयटी मुंबईतून मागविण्यात आले आहेत.

या शेतकरी गटाने उभारलेले आउटलेट हे अष्टविनायक रस्त्यालगत असून या रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते यामुळे याचा फायदा या ग्रुपला होत आहे. सद्यस्थितीला हजार ते बाराशे गुल्फी रोजाना या ग्रुपच्या माध्यमातून विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना चांगली कमाई या व्यवसायातून होत आहे.

शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

बहाद्दराने थेट अमेरिकेतून बियाणं आणलं.. आता एक हजार रुपये किलो ने विकतोय..

शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही शिवाय बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी या ठिकाणी होत आहे. अशा परिस्थितीत शेतीमध्ये बदल करणे आणि बाजारात अधिक मागणीमध्ये असलेल्या पिकांची शेती करणे गरजेचे बनले आहे.

जामखेड तालुक्यातील त्यांचं गाव तसं पाहायला गेलं तर कमी पर्जन्यछायेचा प्रदेश; पण महेंद्र बारसकरांचा नादच खुळा.. त्यांनी थेट रशियातून एक बियाणं आणलं..

चिया सीड्स या औषधी पिकाची शेती सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे या पिकाची शेती या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली असून एक लाख रुपये प्रति क्विंटल या दराने चिया सीड्सची विक्री या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. कर्करोगाला रोगप्रतिकारक शक्ती असलेलं.. कॅल्शियमचं अधिक प्रमाण असलेलं हे धान्य बाजारात एक हजार रुपये किलो या दराने मिळतं.. बारस्करांनी पूर्वीची कसलीही माहिती नव्हती; पण हे बियाणे आणलं.. लावलं..ते उगवलं.. वाढलं.. त्याचं उत्पादन देखील सगळ्यात जास्त घेतलं आणि आता हेच बारस्कर जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन हेच धान्य १ हजार रुपये किलोने विकत आहेत.

चिया नावाचे धान्य अमेरिकेत जास्त करून खाल्लं जातं. हे श्रीमंताचं अन्न म्हटलं जातं..पण ते आरोग्यास परिपूर्ण देखील मानलं जातं. अगदी दोन ते तीन ग्राम या प्रमाणात हे भिजवलेले धान्य घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स, कॅल्शियम व विटामिन्स मिळतात असं सांगितलं जातं. हे धान्य जामखेड सारख्या भागात उगवून, वाढवून ते बाजारात आणण्याचं काम महेंद्र बारस्कर या सामान्य शेतकऱ्यानं केलं आहे.

तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे याचे धान्य आहे. लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे कमी पाण्यात या पिकाची शेती शक्य होते. अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहत असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.

तसेच या पिकाला वन्य जनावरांपासून कोणतीही हानी होत नाही. याच्या ऊग्र वासामुळे जनावरे हे पीक खात नाहीत. तसेच या पिकावर कोणत्याच प्रकारचा रोग देखील येत नाही. वास्तविक या पिकापासून पाच क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळते. मात्र महेंद्र यांनी सेंद्रिय पद्धतीने एका एकरातून दहा क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन या पिकाच्या शेतीतून मिळून दाखवले आहे.

बारस्कर यांची पुतणी रशियात वैद्यकीय शिक्षण घेते. त्या ठिकाणी तिने हे सर्व पाहिले आणि आपल्या कुटुंबासाठी रशियातील दवई या भागातून तिने हे बियाणे खरेदी करून गावाकडे पाठवून दिले. बारस्कर यांना देखील फारशी माहिती नव्हती. पण त्यांनी युट्युब सर्च करून याची लागवड पद्धत पाहिली.

त्यांच्याकडेही पाण्याची कमतरता आहे. पण हे पीक कमी पाण्यात येते याची माहिती मिळाल्याने त्यांना हुरुप आला. त्यांनी हे बियाणे लावले. बियाण्याची काळजी घेतली. रोपांची काळजी घेतली आणि प्रती एकरी सात क्विंटल पर्यंत याचे उत्पादन मिळते अशी माहिती त्यांना मिळाली होती. मात्र शेतातील पोताचा दर्जा एवढा चांगला ठेवला की, याचे उत्पादन एकरी दहा क्विंटल मिळाले.

सध्या बारस्कर हे वेगवेगळ्या कृषी महोत्सवांमध्ये जाऊन या धान्याची महती ग्राहकांना पटवून देत आहेत आणि त्यातून हे धान्य विकत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी १ हजार रुपये प्रति किलो दराने पाच क्विंटल चिया नावाचे धान्य विकले आहे.

एवढ्या महाग दराने हे धान्य लोक कसे घेतील? असा प्रश्न विचारला, तर बारस्कर म्हणाले, दमाने विकेल पण एक हजार रुपयांच्या खाली विकणार नाही. याचे महत्त्व पटवून दिले की लोक घेतात हा माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्याचा अनुभव किंवा कौशल्य यायलाच पाहिजे.

नक्कीच महेंद यांनी केलेला हा प्रयोग इतरांना प्रेरणा देण्याचे काम करेल. देशातील प्रगतशील शेतकरी महेंद्र यांचा सारखाच नवीन प्रयोग शेतीत करतील. तसेच इतर शेतकरी देखील आता बाजारात कायमच मागणीमध्ये असलेल्या आणि उच्च दरात विक्री होणाऱ्या पिकांची शेती करतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

Sonalika चा भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात, एका चार्ज मध्ये 8 तास काम करणार

 देशात इलेक्ट्रिक कार आल्या त्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्या . अशातच ट्रॅक्टर कंपनी का मागे राहील सोनालिकाने पण शेतकऱ्यांसाठी तयार केलाय इलेक्ट्रिक ट्रॅक्टर.

देशातील ट्रॅक्टर उत्पादक सोमालिकाने अलीकडेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. शेतकर्‍यांसाठी ही मोठी उपलब्धता आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्याची खास रचना करण्यात आली आहे. यात समोर सहा गीअर्स आणि मागील बाजूस दोन गीअर्स (6F+2R) आहेत. त्याची सीटही खूप आरामदायक आहे. याला पुढील टायरचा आकार 5-12 आहे तर मागील टायरचा आकार 8-18 आहे.

सोनालिका ट्रॅक्टर्स ही उत्कृष्ट कामगिरी आणि परिणामकारकतेसह ट्रॅक्टरची विस्तृत श्रेणी आहे. अशा परिस्थितीत सोनालिकाने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणखी खास आणि शेतकऱ्यांसाठी योग्य बनवण्यासाठी तयार केला आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमधून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही
इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टर हे केवळ पर्यावरणपूरकच नाही तर ते भविष्यकालीनही आहेत. आज एकेकाळी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसते. पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई तसेच पर्यावरणाचे रक्षण हे त्याचे प्रमुख कारण आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमधून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. शेतीची कामे सहजतेने पूर्ण करणे ही मोठी उपलब्धी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत सोनालीकाने नुकतेच लाँच केलेले सोनालिका टायगर इलेक्ट्रिक अवघ्या चार तासांच्या चार्जिंगमध्ये आठ तास वापरले जाऊ शकते.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत


देशातील ट्रॅक्टर उत्पादक सोनालिकाने नुकताच हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. तो आता शेतकऱ्यांसाठी बाजारातही उपलब्ध झाला आहे. भारतातील प्रत्येक लहान-मोठ्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची खास रचना करण्यात आली आहे. त्याची भार वाहून नेण्याची क्षमता 500 किलोपर्यंत आहे. या ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, ट्रॉली, ग्रास कटर, स्प्रेअर अशी अनेक कामे शेतकरी करू शकतात. आणि त्याची किंमत 6.10 ते 6.40 लाख रुपये आहे

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे फीचर्स


सोनालिका टायगर इलेक्ट्रिक 11 एचपी श्रेणीतील एक योग्य ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर शक्तिशाली सिलिंडर आणि 11 एचपी इंजिनने सुसज्ज आहे. टायगर इलेक्ट्रिक रेट केलेल्या RPM वर उच्च कार्यक्षमता आणि उत्पादकता प्रदान करते. हा ट्रॅक्टर हेवी ड्युटी प्रकार 6F+2R गियरबॉक्स ट्रान्समिशन आणि कार्यक्षम कामगिरीसाठी क्लच पर्यायासह येतो. मेकॅनिकल स्टीयरिंग स्टीयरिंग पर्यायासह, हे शेतकऱ्याच्या चांगल्या सोयीसाठी एर्गोनॉमिक सीटसह डिझाइन केलेले आहे.

हा ट्रॅक्टर विशिष्ट मातीच्या परिस्थितीसाठी योग्य आहे
हे 127.0mm – 304.8mm (5.0 – 12 ) समोरच्या टायरचा आकार आणि 203.2mm – 457.2mm (8.0 – 18) मागील टायरचा आकार मोजते. यामुळे टायगर इलेक्ट्रिक OIB ब्रेकसह उत्तम वाहन नियंत्रण प्रदान करते. यात 500 किलोग्रॅम उचलण्याची क्षमता आणि उत्कृष्ट ऑपरेशनल परिणामांसाठी अचूक हायड्रॉलिक देखील आहे. हे रोटाव्हेटर, ट्रॉली, गवत कटर, स्प्रेअर यांसारख्या विविध अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले आहे. अत्याधुनिक सोनालिका टायगर इलेक्ट्रिक विशिष्ट पीक आणि मातीच्या परिस्थितीसाठी सर्वात अनुकूल आहे. जे चांगल्या उत्पादकतेसह अधिक उत्पन्न मिळविण्यास मदत करते.

कंपनीने फास्ट चार्जिंग सिस्टिमही ऑफर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 4 तासात या ट्रॅक्टरची बॅटरी फुल चार्ज करु शकता. हा ट्रॅक्टर 2 टन वजनाच्या ट्रॉलीसोबत 24.9 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो. एकादा फुल्ल चार्ज केल्यावर हा ट्रॅक्टर तब्बल 8 तास काम करतो. सोनालिका ट्रान्समिशनने सुसज्ज असल्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूपच सोयीस्कर ठरू शकतो. कारण या ट्रॅक्टरमधून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर पडत नाही.

ट्रॅक्टर चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेलची गरज नाही !
हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेलची गरज नाही. हे तुमच्या घरात असलेल्या इतर कोणत्याही विद्युत उपकरणासारखेच आहे. ज्याला चालवण्यासाठी फक्त वीज लागते. विज्ञान आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने आता शेतकरीही पेट्रोल-डिझेलशिवाय शेतात ट्रॅक्टर चालवू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही वाचणार असून नफाही अधिक होणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर इलेक्ट्रिक बॅटरीपासून चालवला जातो

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

असा आहे ६.५कोटी कर्ज ते ५२५ कोटीचा प्रवास; सह्याद्री फार्म नाशिक.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेल्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही कंपनी देशातले नवे मॉडेल आहे.

सह्याद्री फार्म्स हे मोहाडी च्या एका डोंगरावर उभं असलेलं एक भन्नाट साम्राज्य. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली आणि शेतकऱ्यांमार्फत चालवली जाणारी कंपनी म्हणजे सह्याद्री फार्मर्स! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आराखडा नजरेसमोर ठेवून उभी ठाकलेली, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटायला भाग पाडणारी सह्याद्री फार्म्स!

सह्याद्री फार्म ची स्थापना नाशिक मधील एका तरुणाने म्हणजेच श्री. विलास शिंदे यांनी २०११ साली केली. आजच्या सह्याद्री फार्मचे ते चेअरमन आणि सर्वेसर्वा आहेत.

सह्याद्री फार्म्सचे स्वतःचे  पॅक हाऊस, जॅम, ज्यूस केचअप युनिट, IQF युनिट,लॅब, ट्रेनिंग सेंटर आहे द्राक्षाच्या वेगवेगळ्या जाती तसेच संत्रा, पेरू, अंजीर,लिंबू,डाळिंब यांच्याही वेगवेगळ्या जाती त्यांनी तयार केल्या आहेत.

शेतीमध्ये पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एखाद्या उच्च नोकरीची वाट न पकडता स्वतःचं काहीतरी उभं करणं, आपण ज्या मातीत जन्म घेतला आहे त्या मातीतल्या लोकांना समृद्ध काढण्यासाठी त्यांचं असं काही निर्माण करणं हे स्वप्न घेऊन खरतर १९९५ पासून एका प्रवासाला सुरुवात झाली.

द्राक्ष पिकातील त्यांची सुरवातीची वाटचाल देखील खूप आव्हानात्मक गेली. काही विश्वासू शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी एक्स्पोर्टसाठी काम सुरू केलं. 2003-2004 च्या दरम्यान पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवला. 20-25 दिवसांनी कंटेनर तिथं पोहचल्यानंतर अण्णांना मेल आला की क्वालिटी योग्य नसल्याने आपला माल रिजेक्ट करत आहोत. मालाच्या गुणवत्तेबाबत त्यांना खात्री असल्यामुळं त्यांनी नेदरलँड गाठायचं ठरवलं. सकाळी 4 वाजता नाशिक मधून ट्रक पकडून मुंबईत जाऊन एम्बसी मधून व्हिजा मिळवला. संध्याकाळीच विमान पकडून नेदरलँड ला रवाना झाले. तिथं गेल्यावर, मार्केटचा अभ्यास केल्यावर त्यांना समजलं की माल हा गुणवत्ता खराब आहे म्हणून रिजेक्ट केलेला नसून त्यावेळी संपूर्ण मार्केट कोसळलं होतं आणि त्याची झळ यांना बसली होती. हे नुकसान पचावण्याशिवाय त्यांच्या शेतकरी ग्रुपकडे काहीही पर्याय नव्हता.

पुढील वर्षी परत प्रयत्न करून द्राक्ष निर्यात केली आणि यावेळेस मात्र यश मिळालं इतका अपयश पचवून मिळालेले हे यश सर्व शेतकऱ्यांनी सेलिब्रेट केलं.

इथून पुढे खरा प्रवास चालू झाला 2009 साली युरोपियन युनियनने लिओसीन या घटकाची रेसिड्यु मर्यादा अचानक कमी केली परंतु याबाबत भारतीय मार्केटमध्ये काहीही बातमी आली नाही आणि 2009 साली पाठवलेले त्यांचे बरेच कंटेनर या कारणाने रिजेक्ट झाले. याआधी लिओसीन हे द्राक्ष पिकात वापरलं जायचं परंतु बदल झालेला माहित नसल्याने परत मोठं संकट उभा राहिलं. शेतकऱ्याचं भलं मोठं आर्थिक नुकसान झालं.  याच काळात अण्णांनी स्वतःची जमीन विकून शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले परंतु संकटापुढे हात टेकले नाहीत.

शेतकऱ्यांनी संघटित होऊन संकटावर मात केली पाहिजे असे विलास अण्णांचे मत होते त्यामुळे हा सर्व द्राक्ष उत्पादक एका छताखाली एकत्र करून त्यांना द्राक्ष निर्यातीसाठी तयार करणे हे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आणि 2011 साली  सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली आणि इथून पुढे चालू झालेली घोडदौड आपणा सर्वांना माहीत असेलच. दर वर्षी कंटेनर ची संख्या वाढत गेली. आज कंपनीचे 18000 रजिस्टर शेतकरी आहेत आणि 42 देशात आज द्राक्ष एक्स्पोर्ट होत आहेत.

१९९५ ते २०१० या वर्षांमध्ये विलास अण्णा यांनी अनेक अपयशं पाहिली. आपण कित्येक साम्राज्याची सुरुवात शून्यातून होताना पाहिली आहे परंतु सह्याद्री फार्म्सची सुरुवात साडे सहा कोटींच्या कर्जातून झाली आहे.
सुरुवातीला मका आणि टरबुजाच्या शेतीचा प्रयोग केला, तो काही कारणांनी फसला. त्यामागोमाग स्वतःचं डेरी फार्म सुरू केलं पण त्यामध्येही यश आलं नाही. इथवर डोक्यावर ७५ लाखापर्यंत कर्ज झालं. तरीही न डगमगता निर्यातीचा व्यापार सुरू केला. द्राक्षांच्या निर्यातीवर विशेष भर देण्यात आला. यात थोडा जम बसतोय असे वाटत असताना, युरोपात पाठवलेल्या काही कंटेनरचे पैसे तेथील व्यापाऱ्यांनी बुडवल्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि पुढे युरोपात भारतीय द्राक्षांवर आयातीच्या आलेल्या निर्बंधांमुळे नुकसान होऊन कर्ज साडेसहा कोटी पर्यंत जाऊन पोहोचले. आता या परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांनी उद्योग करण्याचा विचार सोडून दिला असता आणि काही जणांच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा आले असते. पण इथे न डगमगता विलास अण्णा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ६२३ शेतकऱ्यांना घेऊन सह्याद्री फार्मची स्थापना केली आणि या सह्याद्रीने येत्या दहा वर्षात या क्षेत्रामध्ये आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे.

आज कंपनीचे 18000 रजिस्टर शेतकरी आहेत आणि 42 देशात आज द्राक्ष एक्स्पोर्ट होत आहेत.

आज प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे ६,००० कामगार सह्याद्रीसाठी काम करत आहेत. ४२ देशांमध्ये सह्याद्री निर्यात करते आहे आणि तिची २०२०-२१ची वार्षिक उलाढाल सुमारे ५२५ कोटी वर पोहचली आहे.

या महाराष्ट्रात इतरही अनेक खेडी आहेत जिथे छोट्या जमिनी असलेले शेतकरी आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ते सह्याद्रीशी कसे जोडले जाऊ शकतात? असे विचारले असता ते म्हणाले. सध्या सह्याद्रीचा व्याप फार मोठा आहे. इथल्या शेतकाऱ्यांसाठीच आम्ही अपुरे पडतो आहोत. या महाराष्ट्राला अशा एक नाही तर अनेक सह्याद्रींची गरज आहे. माझ्या खांद्यावर आधीच खूप भार आहे. त्यात आणखी कुणाला खांद्यावर घेऊन मी तो भार वाढवू इच्छित नाही. परंतु हात देऊन नक्कीच मदत करू शकतो. सह्याद्रीने आपल्या अनुभवाच्या आधारे अनेक फार्मर प्रोड्यूसर कंपनी तयार व्हाव्यात यासाठी, त्यांना प्रशिक्षण द्यावे या हेतूने टाटा स्ट्राईव्हशी हात मिळवून सह्याद्रीमध्ये प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. त्यामधून सह्याद्री सारख्या अनेक कंपनी घडतील आणि आपापल्या विभागांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी काम करू शकतील. त्यांना समृद्ध करू शकतील. अशा पद्धतीने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या एकजूट झाल्यामुळे आणि सुयोग्य यंत्रणेचा वापर केल्यामुळे दूर होऊ शकतील.
“कुणाला खांद्यावर घेऊन स्वतःचा भार वाढवू नका. त्यांना उभे राहण्यास मदत करण्यासाठी हात द्या.” वा! किती मोठा धडा होता हा!


जो आनंद आणि प्रेरणा रायगडावर गेल्यावर मिळते त्याच्याच काही अंशी प्रेरणा सह्याद्रीमध्ये गेल्यावर अनुभवता येते.
कोणत्याही सरकारी योजनांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना स्वाभिमानाने, ताठ मानेने उभं रहायला शिकवणारी, शेतकऱ्यांच्या मेहनतीचं चीज करून देणारी, अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली, ७९८८ नोंदणी केलेले शेतकरी भागदारक असलेली, २३,९९० एकर जमिनीवर लागवड करणारी, १२० गावांमध्ये कार्यरत असणारी, जगभरात ३३,०३६ हुन अधिक ग्राहकांना सेवा पुरवणारी, १६०० टन द्राक्षे तसेच ५५५१३ मॅट्रिक टन टोमॅटो दर वर्षी निर्यात करून या निर्यातीत अग्रेसर असलेली आणि ४२ देशांशी व्यापार करणारी सह्याद्री फार्म्स मराठी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अभिमानास्पद आहे…

वर्षातून दोनदा का साजरी करण्यात येते हनुमान जयंती, वाचा सविस्तर काय आहे कारण

हनुमान जन्म कथा

हनुमान म्हणजेच ज्याला आपण मारुती बजरंग अशा विविध नावांनी जाणतो त्या राम भक्त हनुमान यांची जन्म कहाणी काही अजब अशीच आहे.चला तर मग महारुद्र बजरंग मारुती यांच्या जन्माची गोष्ट आपण पाहूया.प्रभू राम यांचा जन्म रामनवमीला झाला आणि त्यानंतर बरोबर सात दिवसांनी हनुमानाचा झाला.

प्रभू श्रीराम यांचा निष्ठावान सेवक,भक्तम्हणून हनुमान आपल्या सर्वाना परिचित आहे. हनुमानाची असीम भक्ती,अफाट शक्ती आणि असिम विनम्रता अशा अनेक गुणांसाठी ओळखले जातात. हनुमानाच्या जन्माची कथा ही श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे बरे का ? ती कशी तर हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून शंकर महादेवाची पूजा करत होती.आजही शिवभक्त महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात असो….याच दरम्यान अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या देखील आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची आराधना करत होत्या. त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अपत्य प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा समपन प्रसाद म्हणून त्यांनी तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले ते देऊ केले. राणी कैकयीच्या हाती आलेले फळ एक पक्षी घेऊन पळाला. पण उडताना तिच्या हातून ते दिव्य चमत्कारी फळ खाली पडले. हेच फळ वाऱ्याने पक्ष्याच्या चोचितून अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाच्या कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले.

सुमित्रा राणीने आपले अर्धे फळ सोबत वाटून खाले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येच्या तिन्ही राण्याना आणि एकडेअंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला तो अतिशय ईश्वरी अवतार वाटत होता. त्यांनी त्याचे नाव मारुती म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायू देवांमुळे त्या देवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र हे नाव ठेवले. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार म्हणजे शंकराचा अवतार असल्याची ही श्रद्धा आहे.

हनुमान अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्य बिंब पाहून मारुतीला तो सुंदर चेंडू वाटला. आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. आता या सृष्टीचे कसे होणार ?म्हणून हनुमान देवाला अडवायला देवांचा राजा इंद्र आडवा झाला.त्यासाठी इंद्राने आपले वज्र वापरावे लागले. हा वज्रप्रहार मारुतीच्या हनुवतिला लागला.आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमानअसेही पडले.

प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पोर्णिमेला साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल पोर्णिमा ही मार्च किवा एप्रिलमध्ये येत असल्याने या महिन्यात हनुमान जयंती साजरी करण्यात येते. मात्र काही भागात हनुमान जयंती कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही साजरी करण्यात येते. कार्तिक कृष्ण चतुर्दशी ही सप्टेंबर किवा ऑक्टोबर महिन्यात येते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंती विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी करण्यात येते. तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे विविध राज्यात विविध पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येते.

Design a site like this with WordPress.com
Get started